Breaking

Saturday, 3 October 2020

मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- कोविड रूग्णांसाठी शिक्रापूर आणि सणसवाडी येथे नवीन रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा.


मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- कोविड रूग्णांसाठी शिक्रापूर आणि सणसवाडी येथे नवीन रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा-  शिरुर लोकसभा मतदारसंघातील सणसवाडी येथे #कोविड१९ रुग्णांसाठी सी सी सेंटरचे उद्घाटन आणि शिक्रापूर व सणसवाडी ग्रामपंचायतीच्या नविन रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा आमदार @AshokPawarMLA यांच्या हस्ते पार पडला.शिक्रापूर - सणसवाडी जिल्हा परिषद गटातील कोरोना रूग्णांना परिसरातच उपचार मिळाले व रुग्णांना ॲम्ब्यूलन्स सुविधा उपलब्ध व्हावी जिल्हा परिषद सदस्या सौ कुसुमताई आबाराजे मांढरे पाटील व पंचायत समिती सभापती सौ मोनिकाताई नवनाथ हरगुडे यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा  करुन ही सोय उपलब्ध केली.शिरूरचे प्रांताधिकारी  श्री संतोषकुमार देशमुख साहेब, शिरूर तहसिलदार शेख मॅडम, शिरूर गटविकास अधिकारी श्री नलावडे साहेब, शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी श्री मोरे साहेब यांनीही या मागणीची दखल घेतली.  त्यानुसार सणसवाडी येथील कृष्णलिला मंगल कार्यालयात कोविड केअर सेंटर सुरू झाले.याशिवाय सणसवाडी, शिक्रापूर ग्रामपंचायत प्रशासक श्री जी.एल.काळे साहेब व सणसवाडी गावचे ग्रामविकास अधिकारी श्री पवणे व ग्रामविकास अधिकारी श्री गोरे यांनीही रुग्णवाहिकेसाठी मोलाची भूमिका पार पाडली. यावेळी शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष रविबापू काळे, शिरूर काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष श्री वैभवमामा यादव, मा. सभापती शशिकांत दसगुडे, मा. उपसभापती श्री विश्वासकाका ढमढेरे, मा.उपसभापती श्री अनिल भुजबळ, खरेदी विक्री संघाचे चेअरमन श्री राजेंद्र नरवडे उपस्थित होते.याशिवाय उपसभापती विकास आबा शिवले,बाजार समितीचे संचालक आबाराजे मांढरे पाटील, नवनाथ हरगुडे, दत्ताभाऊ हरगुडे, पंडितआप्पा दरेकर,सरपंच श्री रमेश सातपुते, सुभाष खैरे,गौरवदादा करंजे पाटील, निलेश थोरात,भानुदासशेठ दरेकर, गोरक्ष भुजबळ व इतर मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment