Breaking

Saturday, 3 October 2020

मोडनिंब प्रतिनिधी/ अक्षय खंदारे- यमाई देवस्थान ट्रस्ट मोडनिंब च्या वतीने उमा विद्यालयाच्या नुतन संचालक मंडळाचा सत्कार समारंभ.


मोडनिंब प्रतिनिधी / अक्षय खंदारे- यमाई देवस्थान ट्रस्ट मोडनिंब च्या वतीने उमा विद्यालयाच्या नुतन संचालक मंडळाचा सत्कार समारंभ- याबाबत सविस्तर वृत्त असे की मौजे मोडनिंब मधील श्री. उमा विद्यालयाच्या संचालक मंडळाच्या निवडणूका नुकत्याच पार पडल्या या निवडणुकीत मोडनिंब येथील परिवर्तन पॅनल ने बाजी मारली असून नुतन अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व सर्व संचालक मंडळ यांचा सत्कार समारंभ मोडनिंब येथील यमाई देवस्थान ट्रस्ट मोडनिंब च्या वतीने यमाई देवस्थान मध्ये पार पडला यामध्ये नुतन अध्यक्ष ह्वि.के.पाटील, उपाध्यक्ष एम. टी.गिड्डे, सचिव बी.एस. पाटील तसेच संचालक डाॅ. दिलिप कुलकर्णी, निवृत्ती सोपान सुर्वे, निवृत्ती भगवान सुर्वे, आर.बी.पाटील, मच्छिंद्र मोरे, रामदास शेळके यांचा यमाई देवस्थान ट्रस्ट मोडनिंब च्या वतीने यमाई देवस्थान मध्ये सत्कार करण्यात आला यावेळी माढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष कैलास दादा तोडकरी, माजी सरपंच बाबूतात्या सुर्वे, माजी सरपंच कुरण आण्णा गिड्डे, कृषी उत्पन्न बाजार समिती चे संचालक मोहन मोरे, चंद्रकांत मोरे, सतिश सुर्वे सर, संतोष पाटील सर, मोडनिंब चे उद्योजक शहाजी पाटील, राजेश निंबाळकर, राकेश गिड्डे, लखन पाटील, जेष्ठ पत्रकार मारूती काका वाघ, पत्रकार रमेश शिरसट, पत्रकार विरण कुलकर्णी, पत्रकार बंटी पवार, तर या कार्यक्रमाचे आयोजक राजेश पाटणे, तात्यासाहेब पाटणे,सुभाष दादा वेदपाठक,  राजाभाऊ राऊत, बंडू पाटील, शुभम पाटणे, अजिंक्य निकम, बप्पा निकम, जयराम पवार,प्रथमेश पवार , राजाभाऊ महामुनी व यमाई देवस्थान ट्रस्ट मोडनिंब चे सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment