Breaking

Saturday, 3 October 2020

मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- सिंधुदुर्ग जिल्ह्यात आॅक्सीजन प्लांटचे उद्घाटन.


मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार-सिंधुदुर्ग जिल्ह्यात आॅक्सीजन प्लांटचे उद्घाटन- कोरोनामुळे संपूर्ण राज्यात विविध उपाययोजना राज्य सरकारच्या माध्यमातून केल्या जात आहे. त्यातच सिंधुदुर्ग जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोविडच्या रुग्णांना ऑक्सिजनचा अविरत पुरवठा करण्याच्या दृष्टीने उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन प्लांटचे उद्धघाटन पार पडले. तसेच येथील कोविड विभागात पाहणी देखील केली.
 
यावेळी  कोविड -१९चा सामना करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सक्षम असल्याचे मत मांडले. या जिल्ह्यामध्ये खाटांची उपलब्धता चांगली असून, या खाटांच्या संख्येमध्ये येणाऱ्या काळात आणखी केली जाईल. या ऑक्सिजन प्लांटमुळे जिल्हा ऑक्सिजनच्या पुरवठ्याबाबत स्वयंपूर्ण झाला आहे. रुग्णांना चांगल्या सुविधा देणे हे आमचे ध्येय असून त्यासाठी लागणारी सर्व सामुग्री उपलब्ध करुन देण्यात येईल, असे आश्वासन आढावा बैठकीत दिले.

 हा ६ किलो लीटरचा व ७२ लाख रुपयांच्या निधीतून ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आला आहे.  

यावेळी आमदार श्री. वैभव नाईक, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, श्री. संदेश पारकर, श्री. संजय पडते यांच्यासह जिल्हा सामान्य रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment