Breaking

Monday, 5 October 2020

माढा तालुका प्रतिनिधी/ मदन मुंगळे- भाजपा युवा मोर्चा च्या वतीने टेंभूर्णी-कुर्डूवाडी रोडवरचे काटेरी झाडे- झुडपे काढण्यासंदर्भात सा.बां.विभागाला निवेदन.


माढा तालुका प्रतिनिधी/ मदन मुंगळे-भाजपा युवा मोर्चाच्या वतीने टेंभुर्णी-कुर्डूवाडी रोडचे काटेरी  झाडेझुडपे काढण्यासंदर्भात सा.बां.विभागाला निवेदन-
भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा टेंभुर्णी शहर च्या वतीने टेंभुर्णी कुर्डूवाडी रोड वरील साईट पट्टीला व्यापलेल्या काटेरी झाडेझुडपे तसेच इतर गवत लवकरात लवकर काढावे अन्यथा भारतीय जनता युवा मोर्चा टेंभुणी शहराच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल अशा स्वरूपाचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता नायकवडी साहेब यांना टेंभुर्णी शहर अध्यक्ष विजय भाऊ कोकाटे यांनी दिले.
टेंभुर्णी कुर्डूवाडी रोडच्या साईडला पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात गवत वाढले असून तसेच संपूर्ण साईट पट्ट्या काटेरी झुडपांनी व्यापलेली आहेत एकावेळी समोरासमोर दोन वाहने आली असता वाहनाला साईडला उतरण्यासाठी साईड पट्टी वरती जागा नसल्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे त्यामुळे संबंधित विभागाने लवकरात लवकर साईड पट्टी वरील गवत व काटेरी झुडपे काढून साईट पट्ट्या रिकाम्या करावेत अशा स्वरूपाची मागणी या  निवेदनामध्ये करण्यात आली
                यावेळी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा चे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष व चव्हाणवाडी विकास सेवा सोसायटीचे चेअरमन सुभाष बापू इंदलकर-पाटील भाजपा तालुका प्रसिद्धी प्रमुख सुरज भैय्या देशमुख चव्हाणवाडी चे युवा नेते विजय आबा कदम भाजपा युवा मोर्चाचे शहर कार्यकारिणी सदस्य सुदर्शन दादा ढगे तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment