मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार-आज पंतप्रधानांच्या हस्ते अटल टनेल बोगध्याचे लोकार्पण- आज मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या हस्ते जगातील सर्वात मोठ्या आणि उंच अशा 'अटल टनेल' बोगद्याचे लोकार्पण करण्यात आले, हा दिवस ऐतिहासिक यासाठीच आहे की, परम आदरणीय मा. अटल बिहारी वाजपेयी जी यांनी या बोगद्याची उभारणी करण्याचे स्वप्न पाहिले होते. आज तेच स्वप्न मोदीजींच्या नेतृत्वात सत्यात उतरले आहे. या बोगद्यामुळे लडाखमधील जनतेची आणि भारतीय सैन्याची अनेक कामे लवकरात लवकर होण्यास मदत मिळणार आहे. तसेच या बोगद्यामुळे लडाखच्या विकासाला हातभार मिळाला आहे. विशेष म्हणजे यामुळे सहा महिने देशाच्या संपर्कात नसलेला लाहौल स्पिटीचा भाग आता बाराही महिने संपर्कात असणार आहे.
मोठमोठ्या विकासकार्यांची दूरदृष्टी ही केवळ मा. मोदी जी यांच्याकडेच आहे. त्यांच्या कार्यकाळात देशभरात रस्तेबांधणीचा वेग वाढला, दुर्लक्षित असलेली गावे एकमेकांना जोडली गेली. त्याचप्रकारे अटल जी यांचे स्वप्न पूर्ण करून मोदी जींनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. मोदी जी यांच्या पुढाकाराने सर्वांना गॅस सिलेंडर उपलब्ध होत आहे, एलईडी मार्फत देशभरातील प्रत्येक गाव प्रज्वलित करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, प्रत्येक घरात नळ बसविण्याचे ध्येय त्यांनी बाळगले आहे आणि आता अशा प्रकारचे विकास कार्य वचनबद्ध पद्धतीने यशस्वीरीत्या पूर्ण होत आहे. 'अटल टनेल' हा जगातील सर्वात लांब बोगदा आहे, ही सर्व देशवासियांसाठी अभिमानास्पद बाब आहे.


No comments:
Post a Comment