मंगळवेढा तालुका प्रतिनिधी / अमीर आतार- शिरूर मतदार संघातील नागरी समस्यांबाबत खा.अमोल कोल्हे यांनी घेतला आढावा- शिरुर लोकसभा मतदारसंघातील हडपसर विधानसभा क्षेत्रातील नागरी समस्यांबाबत पुणे
खासदार कोल्हे स्वतः होते उपस्थित
महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांची आमदार चेतन तुपे यांच्यासह खासदार अमोल कोल्हे यांनी भेट घेतली. यावेळी हडपसर,कोंढवा, कात्रज या परिसरातील अनियमित व विस्कळीत पाणी पुरवठा, ससाणेनगर अंडरपास व इतर समस्यांबाबत चर्चा केली. खराडी, नगर रस्ता भागाला सध्या १३० एमएलडी पाणी पुरवठा केला जातो आहे.जेंव्हा भामा आसखेड प्रकल्प पूर्ण होईल, तेव्हा हे १३० एमएलडी पाणी हडपसर विधानसभा क्षेत्रात देण्याची मागणी या बैठकीत केली.या बैठकीला श्रीनिवास बोनाला, व्ही.जी.कुलकर्णी, अनिरुद्ध पावसकर उपस्थित होते. महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, नगरसेविका वैशालीताई बनकर, नंदाताई लोणकर, हमिदा सुंडके, अमृताताई बाबर, योगेश ससाणे, प्रकाश कदम, हाजी गफूर पठाण, बंडूतात्या गायकवाड उपस्थित होते. याशिवाय गणेश ढोरे, स्वीकृत सदस्य अविनाश काळे, मनोज घुले, संजीवनी जाधव तसेच हाजी फिरोज शेख, सुनील बनकर व नारायण लोणकर, जिल्हा नियोजन समिती सदस्य अमोल हरपळे हे देखील उपस्थित होते.


No comments:
Post a Comment