सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर- विठ्ठल गंगा फार्मर्स च्या माध्यमातून शेतकर्यांच्या प्रगतीसाठी काम...मा.श्री. धनराज दादा शिंदे- याबाबत सविस्तर वृत्त असे की माढा व करमाळा तालुक्याचे सीमारेषेवरती दहिवली- निमगाव- कन्हेरगाव या तीन गावच्या सीमारेषा परिसरातील
विठ्ठल गंगा फार्मर्स कंपनी आपला प्रकल्प उभारत असून पाणीपुरवठा, विद्युतपुरवठा, दळणवळणाच्या सोयी, चालू करण्यासाठी सर्व यंत्रणा अहोरात्र कार्यरत आहेत. प्रकल्प विस्ताराच्या दृष्टीने सर्व बाजूंनी सोयीस्कर अशी जागा असल्यामुळे कित्येक पटीने शेतकर्यांना सेवा देणे सोयीस्कर होणार असल्याचे धनराज दादा शिंदे यांनी सांगितले आहे.
माढा, करमाळा, पंढरपूर, तालुक्यातील सुमारे दोन हजार शेतकर्यांनी नोंदणी केली आहे. यामध्ये केळी, डाळींब, द्राक्षे, मिरची, इ.पिकांवरती काम करण्यात येणार आहे व परिसरातील इतर पिके यावरती ही काम करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. जुन्या व नव्या कृषी पणन धोरणाचा मोठा फायदा शासकीय तसेच खाजगी यंत्रणांद्वारे समन्वय साधून सभासदांना होणार आहे. सध्याच्या केंद्र व राज्याच्या व एकूण कृषी पणन क्षेत्राच्या उत्क्रांतीचा लाभ या प्रकल्पात होणार असून सरकारला अपेक्षित असे विविध अंगी सक्षम असणारे शेतकरी संघटन उत्पादक कंपनी च्या माध्यमातून तयार होणार आहे. व याचा सर्व फायदा हा शेतकर्यांना प्रगती कडे घेऊन जाणार असल्याचे धनराज दादा शिंदे यांनी सांगितले आहे.


No comments:
Post a Comment