मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार-पेणमधील गणेश मूर्तीकारांचा मनसेचे अध्यक्ष मा. राजसाहेब ठाकरे यांच्याशी संवाद- याबाबत सविस्तर वृत्त असे की पेणमधील गणेशमूर्तिकारांच्या शिष्टमंडळाशी राजसाहेब ठाकरे यांच्याशी संवाद साधला, गणेशोत्सव साजरा करू नका, असं कोणतंच सरकार सांगू शकत नाही. पण इतक्या श्रद्धेने घरी आणलेल्या, भक्तिभावे पुजलेल्या गणेशमूर्तीची विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी जी विटंबना होते ती पाहवत नाही. त्यामुळे मूर्तिकारांना माझं आवाहन आहे की, तुम्हाला आता पर्यावरण पूरक पर्याय शोधण्याची गरज आहे असे मत राजसाहेब ठाकरे यांनी व्यक्त केले.
मी तुम्हाला एका धोक्याची पूर्वसूचना देऊन ठेवतो की, तुम्ही जर मूर्त्यांच्याबाबतीत पर्यावरणपूरक पर्याय समोर आणला नाहीत तर त्याला परदेशी पर्याय उपलब्ध होईल आणि लोकं त्या पर्यायांकडे वळतील.
माझं अगदीच असं म्हणणं नाही की जलप्रदूषण फक्त मूर्ती विसर्जनामुळेच होतं इतर अनेक मोठे घटक आहेत ज्यांच्यामुळे नद्या, समुद्र प्रदूषित होतात, केली जातात.
मूर्तिकारांचे काही प्रतिनिधी आणि माझे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील सहकारी मिळून एक शिष्टमंडळ घेऊन महाराष्ट्र सरकारच्या संबंधित खात्याला भेटा. मी स्वतः महाराष्ट्र शासनाशी विसर्जनाच्या पर्यायी व्यवस्थांबद्दल, मूर्तिकार कारखानदारांच्या थकलेल्या कर्जाबद्दल बोलेन दरम्यान तुम्हीही आता पर्यावरणपूरक पर्याया उभा करा असे यावेळी राजसाहेब म्हणाले.
No comments:
Post a Comment