सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर- श्री. उमा विद्यालय मोडनिंब येथे महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त व लाल बहादूर शास्त्री जयंतीनिमित्त स्वच्छता मोहीम- याबाबत सविस्तर वृत्त असे की श्री. उमा विद्यालय मौजे मोडनिंब येथे 2 आॅक्टोंबर महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांनी जी मार्गदर्शक तत्त्वे सांगितली आहेत त्या तत्वानुसार
नवीन आलेले संचालक मंडळ व विद्यालयातील सर्व स्टाफ तसेच सदगुरू बैठकीतील सदस्यांनी एकत्रित येऊन विद्यालयाचा सर्व परिसर स्वच्छ करून घेतला आहे कोरोनाच्या महामारीमुळे आज सर्व विद्यालये शासनाच्या आदेशानुसार बंद अवस्थेत आहेत व त्यामुळे परिसरात खूप गवत उगवलेले होते,
सध्या नविन आलेल्या संचालक मंडळातील सर्वांनी एकजूट होऊन व शाळेतील सर्व स्टाफ तसेच सदगुरू बैठकीतील सदस्यांनी एकत्रित येऊन महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांच्या तत्वानुसार पाऊल पुढे ठेवत विद्यालयाचा सर्व परिसर स्वच्छ करून घेतला आहे यावेळी संस्थेचे नुतन अध्यक्ष ह्वि. के.पाटील, उपाध्यक्ष एम. टी.गिड्डे, सचिव बी.एस. पाटील व सर्व संचालक मंडळ तसेच गावातील माजी सरपंच बाबूतात्या सुर्वे, माजी उपसरपंच डाॅ. सागर दादा गिड्डे, मनसेचे जिल्हा अध्यक्ष प्रशांतजी गिड्डे, शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष वैभव आण्णा मोरे, तसेच सदगुरू बैठकीतील सदस्य व विद्यालयातील मुख्याध्यापक ए.पी.पाटील सर, सतिश सुर्वे सर,संतोष पाटील सर, s.r.पाटील सर, संतोषजी लोकरे सर, समुद्र सर, कोळी सर, कुंभार सर, बिले सर, लोखंडे सर, जे.बी.पाटोळे सर, रामभाऊ पाटोळे सर, माजी प्राचार्य काटकर सर, माजी प्राचार्य गोवे सर, शिंदे सर, मा.ह.माहडिक चे प्राचार्य दादासाहेब शिंदे सर, राजेश निंबाळकर, श्री. उमा विद्यालय व जुनिअर काॅलेज, किमान कौशल्य विभाग व मा.ह.माहडिक या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व गावातील नागरिकांनी यात सहभाग घेतला होता.


No comments:
Post a Comment