मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/अमीर आतार- जिल्ह्यात शाळा, महाविद्यालये, सिनेमागृहे, जलतरण तलाव 31 आॅक्टोंबर पर्यंत बंदच राहणार- याबाबत सविस्तर वृत्त असे की सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी शंभरकर यांच्या आदेशानुसार कोरोना चा वाढता प्रादुर्भाव, संसर्ग कमी करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात पोलिस आयुक्तालय हद्द वगळून लाॅकडाऊनचे निर्बंध 31 आॅक्टोंबर 2020 पर्यंत वाढविण्यात आले आहेत या काळात शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, शिकवणी वर्ग, सिनेमागृहे, जलतरण तलाव, मनोरंजन केंद्रे, थिएटर बंद राहणार आहेत याबाबत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आदेश जारी केले आहेत, यापूर्वी ज्या उपक्रमाला वेळोवेळी सशर्त परवानगी देण्यात आली होती ते यापूर्वी प्रमाणे लागू राहतील, कोवीड-19 व्यवस्थापनासाठी राष्ट्रीय निर्देशाचे पालन करणे आवश्यक असून दोषींवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे, सार्वजनिक कामाच्या ठिकाणी सहा फुटांचे अंतर ठेवावे, पाच पेक्षा अधिक लोकांना दुकानात येण्यास परवानगी देण्यात येवू नये, मोठ्या सर्वजनिक मेळाव्या वर बंदी असेल विवाहस्थळी पन्नास नागरिकांना एकत्र येण्यास परवानगी असेल अंतयात्रेला वीस नागरिक एकत्र येऊ शकतील सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास बंदी असेल तर दारू पान गुटखा तंबाखूचे सेवन वर निर्बंध असणार आहेत असे आदेशात आदेशाचे लागू करण्यात आले आहे.
तर सर्व अत्यावश्यक सेवेची दुकाने आस्थापना यापूर्वीच्या आदेशात नमूद केल्याप्रमाणे सुरू असणार आहेत आदेशाचे उल्लंघन केल्यास त्या व्यक्तीस संस्थेस संघटनेस कलम 188 आणी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 नुसार कारवाई करण्यात येईल असे आदेशात नमूद करण्यात आले आहे त्याचबरोबर प्रतिबंधित सांसर्गिक क्षेत्रामध्ये यापूर्वी देण्यात आलेले आरोग्यविषयक आदेश लागू राहतील अशी माहिती सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे.


No comments:
Post a Comment