मोडनिंब प्रतिनिधी/ अक्षय खंदारे- गणेश जेष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष हनुमंत कुंभार गुरूजी यांच्या प्रयत्नांना यश- याबाबत सविस्तर वृत्त असे की मोडनिंब बसस्थानकात बसेस न आणता उड्डाणपूलावरून घेऊन जात असल्याने प्रवाशांची गैरसोय होत असल्याच्या अनेक तक्रारी गणेश जेष्ठ नागरिक संघाने सोलापूर, पुणे, नाशिक, रायगड, रा.प . विभाग प्रमुखाकडे केल्या होत्या, मोडनिंब बसस्थानकात अनेक प्रवाशी बसची वाट बघत थांबलेले असतात, किंवा पुणे व अन्य ठिकाणाहून मोडनिंबला येणार्या प्रवाशांना अनेक वेळा नाहक त्रास सहन करावा लागतो, महत्वाच्या कामाला वेळेवर पोहचता येत नाही त्याबाबत अनेक वेळा प्रवाशी व वाहन चालक यांच्यात संघर्षही झालेला आहे, तेव्हा सर्व बसेस उड्डाणपूलावरून न नेता मोडनिंब बसस्थानकात घेऊन जाण्याविषयी गणेश जेष्ठ नागरिक संघटनेने मागणी केली होती.
त्याप्रमाणे पुणे विभाग नियंत्रकांनी एक पत्रक काढून पुणे विभागाअंतर्गत असणार्या आगारातून सर्व मार्गावर सुटणार्या सर्व बसेस उड्डाणपूलावरून न घेऊन जाता सर्ह्विस रोडने बस थांब्यावर घेऊन जाव्यात तसे न केल्यास संबंधित चालक, वाहक, यांचेवर प्रथम निलंबन करून रा.प.शिस्त व आदेवन कार्यपद्धती नुसार प्रमादिय कडक कारवाई करण्यात येईल असे सूचना पत्र काढले आहे, या सूचनांची माहीती चालक,वाहक यांना होण्यासाठी सदर पत्राला सूचना फलकावर प्रसिद्धी देण्यात येईल व त्याप्रमाणे सोलापूर बसस्थानकाच्या सूचना फलकावर सदर पत्र प्रसिद्ध केले आहे सध्या मोडनिंब बसस्थानकात सर्व बसेस येत असल्याने उपलब्ध प्रवाशांची सोय होत आहे अशी माहीती गणेश जेष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष श्री. हनुमंत कुंभार गुरूजी यांनी VBP न्यूज सोबत बोलताना दिली.


No comments:
Post a Comment