मोडनिंब प्रतिनिधी/ अक्षय खंदारे- मोडनिंब मध्ये आरटीओ कॅम्प सुरू मनसेच्या प्रयत्नाला यश- याबाबत सविस्तर वृत्त असे की कोणतेही टू ह्वीलर फोर ह्वीलर लायसेन्स असूद्या या अगोदर वाहनधारकांना अकलूज ला जावे लागायचे व अनेकांना आर्थिक झळ व वेळ ही खर्च होत असे म्हणून या संदर्भात मनसेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष मा. प्रशांतजी गिड्डे हे मोडनिंब ला आरटीओ कॅम्प भरवण्यात यावा म्हणून सातत्याने प्रयत्न करत होते अखेर त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून आज मोडनिंब मध्ये आरटीओ कॅम्प सुरू झाला आहे ,व या गिड्डे यांच्या प्रयत्नातामुळे अनेक लोकांची सोय होणार आहे व अनेकांनी मनसेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष मा प्रशांतजी गिड्डे यांचे मनापासून आभार मानले आहेत तसेच हा कॅम्प प्रत्येक महिन्याच्या 22 तारखेला मोडनिंब मध्ये चालू असणार आहे अशी माहिती मनसेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष मा प्रशांतजी गिड्डे यांनी VBP न्यूज सोबत बोलताना दिली.
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment