Breaking

Tuesday, 22 September 2020

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - रयतक्रांती संघटनेचे प्रा. सुहास पाटील सर यांनी भाजप सरकारच्या काळात एकट्या माढा तालुक्यातील रूग्णांना 3 कोटी 80 हजार मिळवून दिले.


सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - रयतक्रांती संघटनेचे प्रा. सुहास पाटील सर यांनी भाजप सरकारच्या काळात एकट्या माढा तालुक्यातील रूग्णांना 3 कोटी 80 हजार मिळवून दिले- याबाबत सविस्तर वृत्त असे की राज्यात भारतीय जनता पार्टी चे सरकार असताना माजी मंत्री मा.सदाभाऊ खोत यांच्या माध्यमातून रयतक्रांती संघटनेचे व कृषीमुल्य आयोगाचे सदस्य मा.प्रा. सुहास पाटील सर यांनी माढा तालुक्यातील गोरगरीब रूग्णांना मुख्यमंत्री सहायता निधीतून एकट्या माढा तालुक्यातील रूग्णांना जवळ जवळ 3 कोटी 80 हजार रूपये मिळवून दिले अशी माहिती प्रा.सुहास पाटील सर यांनी VBP न्यूज सोबत बोलताना दिली व ते पुढे म्हणाले की त्यावेळी मुख्यमंत्री सहायता निधी विभागाचे प्रमुख ओम प्रकाश शेट्टी साहेब हे होते व खूप जबरदस्त काम या विभागात शेट्टी साहेबांनी केले व त्यामुळे खूप लाखो लोकांचे जीव वाचले, तसेच प्रा.सुहास पाटील सर म्हणाले की बेंबळे, भोसरे, उजनी ( होळे) येथील लहान मुलांची आॅपरेशन मुंबई मधील खाजगी रूग्णालयात मोफत केली, बर्याच रूग्णांना कॅन्सर, हृदयशस्त्रक्रीया, सांधे रोपन, किडनी, यकृत यासंबंधी आजारांवर सदाभाऊंच्या माध्यमातून पैसे मिळवून दिले, आजही सरांना रूग्णांचे, नातेवाईकांचे फोन येतात सर आम्हाला पैसे मिळवून द्या, मन खिन्न होते खूप वाईट वाटते कारण या शासनाने इतर रोगांवर उपचारासाठी मुख्यमंत्री सहायता निधीचे पैसे बंद आहेत आणी आज संपूर्ण भारतभर कोरोनाने विळखा घातला आहे खाजगी दवाखाने दीड ते दोन लाख बिल करत आहेत म्हणून राज्य सरकारने कोविड साठी लागणारे रेमिडिसिन या औषधाचे कमीत कमी पाच इंजेक्शन डोस तरी सगळीकडे मोफत द्यायला हवेत, मग ते खाजगी हाॅस्पीटल्स असो तरी तिथे पण, एका डोसची किंमत जवळपास पाच हजार रूपये आहे, ही योजना राबवल्यास सर्वसामान्य कुटूंबाना कोरोनापासून वाचण्यासाठी मदत मिळेल अशी खंत रयतक्रांती संघटनेचे प्रा. सुहास पाटील सर यांनी बोलून दाखवली.

No comments:

Post a Comment