Breaking

Sunday, 20 September 2020

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - संभाजी ब्रिगेड शिक्षक आघाडी सोलापूर पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर.


 *संभाजी ब्रिगेड शिक्षक आघाडी सोलापूर पदाधिकाऱ्यांच्या  निवडी जाहीर*                                    सोलापूर, रविवार दि. 20/09/2020  रोजी, प्रदेश अध्यक्ष ॲड. मनोज अखरे, महासचिव सौरभ खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजी ब्रिगेड  कार्यकारिणी सदस्य तथा पुणे पदवीधर मतदार संघाचे उमेदवार इंजि. मनोजकुमार गायकवाड यांच्या अध्यक्षते खाली, सोलापुर जिल्हाध्यक्ष सोमनाथ राऊत व सचिन जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत  संभाजी ब्रिगेड सोलापूर शिक्षक आघाडी  पदाधिकाऱ्यांची निवडी करण्यात आल्या. 

*प्रा श्री भगवान बस्के यांची संभाजी ब्रिगेड शिक्षक आघाडी समन्वयक* म्हणून अध्यक्ष इंजि. मनोजकुमार  गायकवाड यांनी सर्वानुमते घोषणा केली तसेच *सोलापूर जिल्हा कार्यकारिणीच्या* निवडी पुढीलप्रमाणे,                                    
1) जिल्हा अध्यक्ष प्रा. विशाल दारफळे 
2) उपाध्यक्ष प्रा. रामहरी वायचळ 
3) खजिनदार प्रा. भाऊसाहेब कांबळे 
4) सचिव प्रा श्री राहुल रिकीबे 
5) सह सचिव प्रा. पुरुषोत्तम शिंदे 
6) सोलापूर शहर अध्यक्ष प्रा. मोहन राठोड.
7) प्रसिद्धी प्रमुख प्रा. अय्याज शेख.       

*सोलापूर तालुका कर्यकरणी* वरती तालुकाध्यक्ष म्हणून पुढील प्रमाणे निवडी करण्यात आल्या,
1) बार्शी -प्रा. प्रशांत शेळके 
2) माढा- प्रा. बाळासाहेब खरात
3) अक्कलकोट- प्रा. मल्लिनाथ कारले 
4) पंढरपूर- प्रा. महेश अटकळे 
5) मोहोळ- प्रा. बाळासाहेब गुंड 
6) करमाळा- प्रा. कल्याण मारकड              वरील सर्वांच्या निवडी या सर्वानुमते करण्यात आल्या. 

या वेळी प्रमुख उपस्थीत मराठा सेवा संघाचे कार्याध्यक्ष संजय जाधव, अध्यक्ष हनुमंत पवार, डॉ पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेचे जिल्हा अध्यक्ष जीवन यादव सर, कल्याण गव्हाणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.  सोलापूर जिल्हा काँग्रेस शिक्षक सेल चे अध्यक्ष गिरीष सोनटक्के सर, प्रा श्रीधर सगेल ,प्रा काशीराय हाविनाळे, प्रा.समाधान शिंदे,  प्रा वाघमोडे, प्रा प्रशांत नागुरे प्रा अबूबकर धांडोती इ. तसेच विविध संघटनेचे पदाधिकारी व इतर अनेक प्राध्यापक, शिक्षक हजर होते.

यावेळी विनाअनुदानीत शिक्षकांच्या अडचणी उपस्थित शिक्षकांनी मांडल्या  यावरती संभाजी ब्रिगेडची भुमिका व पुढील नियोजन याबाबत इंजि. मनोजकुमार गायकवाड यांनी सत्य परिस्थिती अवगत करत मार्गदर्शन केले. 

प्रा भगवान बस्के यांनी सुत्रसंचालन केले, शिवश्री सदाशिव पवार व शिवश्री कल्याण काळे यांनी सर्वांचे स्वागत करुन नियोजनासाठी विशेष प्रयत्न केले.


No comments:

Post a Comment