मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार-विधेयकाच्या विरोधात अंबाला, पंजाब, येथील शेतकर्यांची अहिंसेच्या मार्गाने आंदोलनाला सुरूवात- परिस्थिती कोणतीही असो,
त्यात तग धरून ठेवण्याची क्षमता ही शेती क्षेत्राकडे जास्त आहे.
जगाला पोसायची खरी ताकद शेतकऱ्याच्या मनगटात आहे.
घाम गाळून जिवाचं रान करून राबण्याची इच्छाशक्ती फक्त शेतकरीचं दाखवू शकतो.
नि हे सगळं कमी म्हणून मनुष्य आयुष्याला शेतीशिवाय भविष्यात पर्याय नाही, हे त्रिकालबाधित सत्य असताना...
शेतकऱ्याचीचं अग्निपरीक्षा ?
पिढ्यांपिढ्या रानात राबून खाणारे नि शेताच्या बांधावरून माल विकून उदरनिर्वाह करणारे शेतकरी बघितले आहेत.
आपल्यासारखं त्यांना मोबाईल, कम्प्युटर, कॅल्क्युलेटर या आधुनिक साधनांची आजही गरज पडत नाही.
नांगर, खुरपं, बेडगं, दात्याळ यानेच आजही शेती उत्तमरीत्या केली जातेय नि भरगोस उत्पादन काढलं जातं.
जगाला पोसत असणाऱ्या या शेतकऱ्याची मात्र आपल्याकडूनचं फसवणूक होताना दिसत आहे.
कदाचित निष्ठा, प्रामाणिकपणा, विश्वास ही मूल्यं समाजात लिहण्यापूरती उरली आहेत.
फसवी आश्वासन, बोगस बी-बियाणं असो वा मग सरकारचे निर्णय...सगळे शेतकऱ्याची फसवणूक करणारे आहेत.
आज राज्यसभेत झालेला गोंधळ हा निंदनीय आहे, शेतकऱ्याच्या हक्कांची गळचेपी करणारा व त्याचं शोषण करणारा आहे,
अगदी इंग्रजांसारखाचं.
या सगळ्या परिस्थितीत एकचं पर्याय आहे..
महात्मा गांधी व त्यांनी सांगितलेला सत्याग्रह.
देशभरातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन अहिंसेच्या मार्गाने सत्याग्रह करणे, हा मार्ग आहे नि आता हे झालं नाही तर शेतकरी पिढ्यांपिढ्या गुलाम बनून जगतील, हे ही तितकंच सत्य.
No comments:
Post a Comment