Breaking

Friday, 18 September 2020

माढा तालुका प्रतिनिधी/ शेटफळ-माढा राज्य महामार्गाची दुरावस्था कधी संपणार.


शेटफळ-माढा राज्य महामार्गाची दुर्रावस्था कधी संपणार..... माढा तालुका व मोहळ तालुक्यातुन शेटफळ-माढा या राज्यमार्गाची अंत्यत दुर्रावस्था झाली आहे.वारंवार निवेदने देवूनही प्रशासन याकडे कानडोळा करत असेल तर रयत क्रांती संघटना या राज्यमार्गावरील गावांतील लोकांना बरोबर घेत आंदोलन छेडणार असल्याचा ईशारा रयत क्रांती संघटनेचे जिल्हा समन्वयक तथा राज्य कृषी मूल्य आयोगाचे माजी सदस्स प्रा सुहास पाटील यांनी दिला आहे.माढा-शेटफळ राज्य मार्गावरील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत.रस्त्याच्या साईड पट्ट्या ऊखडलेल्या आहेत.याबाततचे वारंवार निवेदन सार्वजनीक बांधकाम विभागास दिले आहे.दरवर्षी या रस्त्याची देखभाल व दुरूस्तीसाठी पैसे खर्च केले जातात.मिलीभगत असणार्‍या संबधीत ठेकेदाराल दुरूस्तीचे काम दिले जाते.त्यामुळे कामाची क्वालिटी चेक केली जात नाही. रस्त्यावरील खडे मुरूम मातीने भरले जातात.डांबरखडीचा वापर अगदी कमी प्रमाणात केला जातो.त्यामुळे दरवर्षी सदर रस्ता ऊखडला जातो.देखभाल दुरूस्तीच्या कामाकडे जाणूनबुजून प्रशासन दुर्लक्ष करते.त्यामुळे वारंवार पैसे खर्च होऊनही रस्त्ता व्यवस्थित होऊ शकत नाही.मोडनिंब,मोहळ व पंढरपूर तालुक्यातील लोकांची होणारी गैरसोय लवकरात लवकर रस्ता दूरूस्त करून टाळावी.अन्यता जनआंदोलन छेडण्यात येईल असे आवाहन रयत क्रांतीचे प्रा सूहास पाटील यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment