Breaking

Friday, 18 September 2020

मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- हुलजंती येथे ग्रामपंचायत असून अडचण नसून खोळंबा.


मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमिर आतार- हुलजंती ग्रामपंचायत असून अडचण नसून खोळंबा.-         हुलजंती ही मंगळवेढा तालुक्यातील दक्षिण भागात सर्वात मोठी ग्रामपंचायत पंचायत समिती गण, जिल्हा परिषद गण म्हणून ओळखले जाते. गेल्या सहा ते सात दिवसांपासून हुलजंती गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची  पुरवठा  होत नसून नागरिकाचे खूप हाल होत आहे . तसेच हुलजंती येथे ग्राम विकास अधिकारी गेल्या काही दिवसांपासून ग्रामपंचायत कार्यालयाला उपलब्ध नसून, नागरिकांना याचा खूप त्रास होत आहे. हुलजंती ग्रामपंचायत कार्यालय असून अडचण नसून खोळंबा असे हाल झाले आहे. गावामध्ये ठिक - ठिकाणी कचरा - घान पाणी साचले असून कोणीही ग्रामपंचायत कर्मचारी अथवा लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देत नाही. सध्या गावाकडे लक्ष देण्यास कुठलाही अधिकारी सदस्य नसून नागरिकांचे खूप हाल होत आहेत  यासंदर्भात ' जनकल्याण संघटना ' मा. विस्तार अधिकारी पं. स. मंगळवेढा यांच्याकडे निवेदन देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. ताबडतोब  उपाययोजना न झाल्यास थेट ग्रामपंचायत कार्यालय व  पंचायत समिती मंगळवेढा येथे  उपोषणाचा इशारा दिला आहे या गावाला ग्राम विकास अधिकारी त्वरित मिळावा ही विनंती 'जनकल्याण फाउंडेशन'  तर्फे करण्यात आली आहे

No comments:

Post a Comment