सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - श्री. उमा विद्यालय मौजे मोडनिंब येथे अभियंता दिन साजरा- याबाबत सविस्तर वृत्त असे की दि.15 सप्टेंबर 1860 रोजी भारतातील प्रसिद्ध स्थापत्य अभियंते विश्वेश्वरैया मोक्षगुंडम यांचा जन्मदिवस संपूर्ण देशभर अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो त्यांचे प्राथमिक शिक्षण चिक्कबल्लापूर या खेड्यात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत झाले होते व नंतर उच्च शिक्षण बंगलोर च्या सेंट्रल काॅलेज मध्ये झाले, नंतर 1883 मध्ये ते पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून मुंबई विद्यापीठाची अभियांत्रिकीची पदवी परिक्षा प्रथम श्रेणीत उतीर्ण झाले या परिक्षेत ते मुंबई प्रांतात पहिले आले स्थापत्य शास्त्रातील त्यांच्या ज्ञानाचा लौकिक सर्वदूर पसरला आहे 1884 मध्ये त्यांची मुंबई सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्यात त्यांची सहाय्यक अभियंता या पदावर नियुक्ती करण्यात आली होती, 1904 साली शासनाने त्यांना आरोग्य अभियंता या पदावर नियुक्ती केली होती अशा या महान व्यक्तिमत्वाने भारतासाठी अभियांत्रिकी क्षेत्रातील महत्वपूर्ण कार्य केले आहे व भारत सरकारने त्यांना भारतरत्न हा पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे व त्यांच्या सन्मानप्रीत्यर्थ पोस्टाचे तिकिटही काढले आहे त्यांनी अनेक संस्थांना लाखो रुपयाच्या देणग्या ही दिल्या आहेत म्हणून 1998 पासून त्यांचा जन्मदिवस हा अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो म्हणून त्यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून उमा विद्यालय मौजे मोडनिंब येथे अभियंता दिन साजरा करण्यात आला यावेळी मुख्याध्यापक A.P. पाटील सर, संतोष लोकरे सर, कुंभार सर, शिंदे सर ,वसेकर सर,समुद्र सर, कोळी सर, बिले सर, खडके सर, इंगळे सर, पवार सर, माळी सर, गायकवाड सर सर्व स्टाफ उपस्थित होते.
Wednesday, 16 September 2020
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment