Breaking

Wednesday, 16 September 2020

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - माढा तालुक्यातील ग्रामीण रूग्णालयांसाठी कोविड केअर सेंटर ची प्रा. सुहास पाटील सर यांची मागणी.


सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/सतिश निंबाळकर- माढा तालुक्यातील ग्रामीण रूग्णालयांसाठी कोविड केअर सेंटर ची प्रा.सुहास पाटील सर यांची मागणी- याबाबत सविस्तर वृत्त असे की माढा तालुक्यात टेंभूर्णी, परिते, आलेगाव ( ब्रु) या तीन ठिकाणी शासनाची ग्रामीण रूग्णालये आहेत, या तीन ग्रामीण रूग्णालयापैकी एक कोविड रूग्णालय घोषित करून कोरोना रूग्णांवर उपचार करण्यात यावेत अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे जिल्हा समन्वयक प्रा. सुहास पाटील सर यांनी निवेदनाद्वारे केली आहे, टेंभूर्णी परिसरात कोरोनाने थैमान घातले आहे व दिवसेंदिवस रूग्ण संख्या वाढत आहे टेंभूर्णी परिसरातील रूग्णांना कुर्डूवाडी किंवा माढा येथील कोविड केअर सेंटर मध्ये उपचार घ्यावे लागतात एखाद्या रूग्णास श्वसनाचा त्रास झाल्यास त्याला खाजगी रूग्णालयात उपचार घेणे कठीण होत आहे ,टेंभूर्णी, परिते व आलेगाव ( ब्रु ) या तीन ग्रामीण रूग्णालयापैकी शासनाने कोणतेही एक कोविड केअर सेंटर रूग्णालय म्हणून घोषित करावे व तेथे रूग्णांवर उपचार करण्यासाठी आॅक्सीजन, ह्वेंटीलेटरची सोय व वैद्यकीय उपचारासाठी उपकरणे व तसेच सर्व वैद्यकीय स्टाफ उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी रयतक्रांती संघटनेचे जिल्हा समन्वयक प्रा. सुहास पाटील सर यांनी माजी राज्यमंत्रीं मा.सदाभाऊ खोत यांचेकडे केली व या मागणीची तात्काळ दखल घेत आ.सदाभाऊ खोत यांनी आरोग्य मंत्री मा. राजेश टोपे व जिल्हाधिकारी सोलापूर यांना मागणी केली आहे.

No comments:

Post a Comment