Breaking

Wednesday, 16 September 2020

मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- शेतकरी संघटनेच्या वतीने आज निफाड चौफुली परिसरात गनिमी कावा करत चक्काजाम आंदोलन.


मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार-शेतकरी संघटनेच्या वतीने आज निफाड चौफुली परिसरात गनिमी कावा करत चक्काजाम आंदोलन----------------------                                                  @केंद्र शासनाने जाणीवपूर्वक लागू केलेली कांदा निर्यातबंदी हटविण्यात यावी यासाठी शेतकरी संघर्ष संघटनेच्या वतीने आज निफाड चौफुलीवर गनिमी कावा करत चक्काजाम आंदोलन करण्यात आले.      "करोना या संकटात पिजलेल्या शेतकऱ्यांना दोन पैसे मिळतील अशी आशा होती मात्र केंद्र सरकारने अचानक कांदा निर्यातबंदीचा नारा दिल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला  त्यामुळे संतप्त झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱयांनी शेतकरी संघर्ष संघटनेचे संस्थापक अध्यक्ष इंजि.हंसराज वडघुले ,उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष नाना बच्छाव यांच्या नेतृत्वाखाली निफाड चौफुलीवर भव्य चक्काजाम आंदोलन छेडण्यात आले. दरम्यान निर्यात बंदीची झाल्याचे कळताच शेतकरी संघर्ष संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बंद ची हाक देताच निफाड चौफुलीवर शेतकऱ्यांचा ताफा जमू लागला.दुपारी 12 वाजता शेतकऱ्यांच्या गर्दी जमताच गर्दीला मोर्चाचे स्वरूप आले. यावेळी  शेतकरी संघर्ष संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हंसराज वडघुले, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष नाना बच्छाव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनास सुरुवात झाली.यावेळी नरेंद्र मोदी हाय हाय, केंद्र सरकारचा निषेध असो, कांदा निर्यात बंदी हटवलीच पाहिजे, या सरकारचे करायचे काय,खाली तंगड्या वरती पाय अशा घोषणा देत निफाड चौफुली परिसर घोषणांनी दणाणून गेला होता.यावेळी मोर्चाचे रूपांतर सभेत झाले.त्यात शेतकरी संघर्ष संघटनेचे प्रदेशाध्यक्ष हंसराज वडगुले यांनी केंद्र शासनावर आसूड ओढताना सांगितले की                                                                  कांद्याला जीवनाश्यक वस्तूंच्या वस्तूतून वगळण्याच्या वल्गना करणाऱ्या सरकारने कोणतीही मागणी नसतांना कांदा                निर्यातबंदी केली. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारताची प्रतिमा बिनभरवशाचा निर्यातदार अशी झाली आहे.याउलट याच धोरणाचा फायदा पाकिस्तान व चीन देशाला झाला आहे. बिहार निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारने हा निर्यातबंदीचा निर्णय ग्राहकांना खुश करण्यासाठी व शेतकऱ्यांचा घात करण्यासाठी झाला आहे असा आरोप यावेळी वडघुले यांनी केला.                           यावेळी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष नाना बच्छाव मा.कैलासराव खांडबहाले जिल्हा उपाध्यक्ष संजय पाटोळे, जिल्हा सरचिटणीस तानाजी वावधने, युवा आघाडी जिल्हा कार्याध्यक्ष नितिन कोरडे निफाड तालुका अध्यक्ष सुनिलभाऊ कापसे निफाड शहर अध्यक्ष अनिल वडघुले, ता.उपाध्यक्ष मा.शरद चकोर राम राजोळे, गणेश दाभाडे ,सचिन राजोळे अनेक शेतकरी तसेच संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.                      प्रतिक्रिया----आधीच शेतकऱ्यांचा कांदा पावसामुळे सडून गेला.त्यात करोना लॉकडाउन काळात कांदा तसाच पडून राहिला. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीत खंबीर खुपसला आहे.सिमांवर उभे असलेले वाहन आणि बंदरावर असे जवळपास ४०० कंटेनर कांदा पडुन आहे निर्यात बंदी करतांना शेतकरी संपूर्ण बरबाद करण्याचे धोरण यात आहे.    शासनाने निर्यात बंदी उठवली नाही तर याची मोठी किंमत आगामी काळात शासनाला मोजावी लागेल गनिमी कावा पद्धतीने हे आंदोलन असेच सुरु राहील.भविष्यात आक्रमक पवित्रा घेतला जाईल याची सर्वस्वी जबाबदारी केंद्रशासन व प्रशासनाची राहील.                                    इंजी. हंसराज वडघुले,           संस्थापक अध्यक्ष,शेतकरी संघर्ष संघटना.

No comments:

Post a Comment