Breaking

Monday, 21 September 2020

मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- मंगळवेढा तालुका तलाठी संघाकडून मंगळवेढा तहसीलदार सो.यांना तलाठी संवर्गाच्या विविध मागण्यांसंदर्भात निवेदन.


मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- मंगळवेढा तालुका तलाठी संघाकडून मंगळवेढा तहसीलदार सो.यांना तलाठी संवर्गाच्या विविध मागण्यांसंदर्भात निवेदन- याबाबत सविस्तर वृत्त असे की गेल्या लोकसभा निवडणुकीत मंगळवेढा तालुक्यातील सर्व तलाठी बांधवांनी निवडणुकीचे सर्व कामकाज केले असून वेतनानुसार बेसिक 100 %  निवडणूक भत्ता देण्यात यावा ही प्रमुख मागणी आहे व pm किसान योजना ही कृषी विभागाची असून देखील त्याचे संपूर्ण कामकाज हे तलाठी करत आहेत सदर योजना ही कृषी विभागाकडे वर्ग करण्यात यावी व किसान योजनेबाबत अनेक त्रुटी व समस्या निर्माण होतात तरी याला तलाठी संवर्ग जबाबदार राहणार नाही व तलाठी कार्यालयाची अनेक ठिकाणी  दुरावस्था झाली आहे व काही गावात तलाठी कार्यालये नाहीत त्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी व कार्यालयाच्या पडझडीमुळे दप्तराचे नुकसान होत आहे तरी याला तलाठी जबाबदार राहणार नाही व कार्यालयाच्या दुरूस्ती व बांधकामासाठी लागणारा निधी हा शासन स्तरावर मंजूर करावा अश्या मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

No comments:

Post a Comment