श्रीकांत खांडेकर यांचा आवताडे यांच्या हस्ते सत्कार
हुलजंती -
केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेत देशात २३१ व्या रँक ने उत्तीर्ण झालेले श्रीकांत खांडेकर यांच्या घरी जाऊन दामाजी साखर कारखान्याचे चेअरमन समाधान आवताडे यांनी सत्कार केला.
खांडेकर हे बावची(ता.मंगळवेढा) येथील गरीब कुटूंबातून अंत्यत कष्टाने युपीएसी परीक्षेत उत्तीर्ण होऊन मंगळवेढा तालुक्याच्या लौकीकाला साजेसे असे कार्य केले आहे. खांडेकर कुटूंबाची हलाखीची परिस्थिती असून ही श्रीकांत खांडेकर यांची जिल्हाधिकारी झालेली निवड हे कौतुकास्पद आहे. आई वडीलांच्या कष्टाचे चीज मुलांने करून दाखवले आहे. सामान्य कुटूंबातील खांडेकर जिल्हाधिकारीपदी कार्य करताना सामान्य लोकांच्या समस्येना योग्य न्याय देतील अशी अपेक्षा प्रसंगी बोलताना समाधान आवताडे यांनी व्यक्त केले.
सत्काराबदद्ल श्रीकांत खांडेकर यांनी आवताडे यांचे मनापासून आभार मानले.प्रसंगी उद्योजक संजय आवताडे, फॅबटेक कारखान्याचे चेअरमन सरोज काशी,माजी सभापती प्रदीप खांडेकर,मा. उपसभापती शिवाजी पटाप, कारखान्याचे संचालक सचिन शिवशरण,संजय पवार,प्रा.येताळ भगत, गणेश साळुंखे, महावीर भोसले,प्रा.नागेश मासाळ, बाबासाहेब येडवे, आशपाक पटेल,येडवे गुरुजी, संतोष दिवाण आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment