Breaking

Monday, 21 September 2020

मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- शेतकर्यांची होत असलेली फसवणूक थांबवण्यासाठी विशेष पोलिस महानिरीक्षक साहेब नाशिक यांना निवेदन.


नाशिक दिनांक 21. 9. 2020           प्रति,            माननीय          विशेष पोलीस महानिरीक्षक साहेब नाशिक परिक्षेत्र नाशिक            विषय:- नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची व्यापारी व मजुरांच्या टोळ्या कडून होणारी फसवणूक थांबवणे बाबत विनंती,          महोदय, विनंतीपूर्वक निवेदन देण्यात येते की, महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात प्रमाणे नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात द्राक्षांचे उत्पादन घेतले जाते, त्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो वेळप्रसंगी बँकेकडून कर्ज घेऊन द्राक्ष उत्पादन केले जाते परंतु नैसर्गिक आपत्तीला तोंड घेऊन   द्राक्ष उत्पादक शेतकरी हा द्राक्षाचे उत्पादन घेत असतो सुमारे  95 टक्के द्राक्ष व्यापारी हे परप्रांतीय असतात गेल्या काही वर्षापासून हे व्यापारी शेतकऱ्यांकडून द्राक्ष खरेदी करून इतर राज्यात पाठवतात परंतु पैसे न देता पळून जातात व शेतकऱ्याची फसवणूक करतात त्यामुळे कर्ज काढून उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्याला फार मोठे नुकसान होते बऱ्याच शेतकऱ्यांना आपल्या शेतजमिनी किंवा इतर मालमत्ता विकावी लागली आहे व्यापारी जिल्ह्यातून परस्पर शेतकऱ्यांचा माल विकत घेऊन शेतकऱ्यांना पैसे न देता फसवणूक करून निघून जातात त्यांचेवर शासनाचा कोणत्याही प्रकारचा निर्बंध नसतो हे सर्व टाळण्यासाठी शासनाकडून (पणन महामंडळ) या  शासनाच्या कृषी संस्थेकडून खालील प्रमाणे उपाय योजना करणे आवश्‍यक आहे.                  1) यासाठी शासकीय यंत्रणा व पणन महामंडळ कृषी अधिकारी यांच्याकडे ह्या व्यापाऱ्यांचे रजिस्ट्रेशन किंवा नोंदणी करून त्यांच्याकडून रीतसर नोंदणी फी घेऊन त्यांना ज्या जिल्ह्यात किंवा तालुक्यात व्यापार करायचा असेल त्यासाठी सदर व्यापाऱ्यांचे आधार कार्ड पॅन कार्ड फोटो व्यापाराचे बँकेचे  अकाउंट रेशन कार्ड आधी पुरावे घेऊन त्याच्याकडून योग्य रकमेचे डिपॉझिट व नोंदणी फी घेऊन करावे त्याला वरील माहितीसह द्राक्ष व इतर फळपिके फळपिके शेतीमाल विकत घेण्याचा किंवा खरेदी करण्याचा परवाना शासनाने द्यावा यात शासनाचा सुद्धा फायदा होईल व शेतकऱ्यांची होणारी फसवणूक कळेल तसेच                   2) तसेच द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांकडे  टोळ्या कामासाठी येतात टोळ्या सीझन सुरू होण्याच्या अगोदर शेतकऱ्यांकडून पैशांची उचलून नंतर कामावर येत नाही अशा तरीही शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे अशा प्रकारच्या घटना नाशिक जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी घडलेल्या आहेत यात फसवणूक झालेली शेतकरी पोलीस स्टेशनला तक्रार करण्यासाठी गेल्यानंतर अशा टोळ्या प्रमुखांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात यावे अशी आपणास विनंती करण्यात येत आहे.             आपले विश्वासू हंसराज वडघुले अध्यक्ष:- शेतकरी संघर्ष संघटना महाराष्ट्र .डॉ.वसंत ढिकले :-अध्यक्ष द्राक्ष विज्ञान मंडळ नाशिक मा. चंद्रकांत बनकर :-उपाध्यक्ष द्राक्ष विज्ञान मंडळ नाशिक .नाना बच्छाव अध्यक्ष:- उ.महाराष्ट्र  शेतकरी संघर्ष संघटना मा.नितिन रोटे पा. :-जिल्हा सचिव संभाजी ब्रिगेड मराठा महासंघ मा. मनोज भारती सोशल मिडीया प्रमुख शेतकरी संघर्ष संघटना ,राहुल बि-हाडे आणि अनेक तक्रारदार शेतकरी बांधव उपस्थित होते.

No comments:

Post a Comment