Breaking

Monday, 21 September 2020

सांगली जिल्हा प्रतिनिधी/ मराठा समाजाला सरसकट आरक्षण द्या व ओबीसी प्रवर्गात सामील करून घ्या अशी सांगली जिल्हा संभाजी ब्रिगेडचे चे जिल्हा अध्यक्ष मा.राजेंद्र पाटील यांची मागणी.


सांगली जिल्हा प्रतिनिधी/ मराठा समाजाला सरसकट आरक्षण द्या व ओबीसी प्रवर्गात सामील करून घ्या अशी संभाजी ब्रिगेड सांगली जिल्हा अध्यक्ष मा. राजेंद्र पाटील यांची मागणी- याबाबत सविस्तर वृत्त असे की मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर राज्यातील सर्व मराठा समाज एकवटलेला आहे व आक्रमक झालेला आहे तसेच यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे व हे होवू नये म्हणून व मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रवर्गात सामील करून घ्यावे व सरसकट आरक्षण देण्यात यावे राज्य सरकारने जी आता पोलिस भरती काढली आहे त्यात स्थगिती उठल्यानंतर मराठा पात्र उमेदवारांना भरतीचा लाभ मिळावा अशा प्रकारचे निवेदन संभाजी ब्रिगेड सांगली जिल्हा अध्यक्ष मा. राजेंद्र पाटील व तासगाव तालुका अध्यक्ष अजित पाटील, झुंजार पाटील, प्रमोद साळुंखे, अमर कदम, चंद्रकांत बोराडे, समीर शेख यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे , उपमुख्यमंत्री मा.अजित पवार, मराठा समन्वय समितीचे अध्यक्ष मा.अशोक चव्हाण यांना देण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment