मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- शिरनांदगी तलावातील पाणी पूजनाचा कार्यक्रम आ.भालके यांचे हस्ते पार पडला - म्हैसाळ योजनेतून शिरनांदगी तलाव 100 टक्के भरून घ्यावा , वितरीकांची साफसफाई तात्काळ करून लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पाण्याची आवर्तने वेळेवर देण्याच्या सूचना आ.भारत भालके साहेबांनी सोमवार दि. 21 रोजी शिरनांदगी येथे दिल्या...
शिरनांदगी तलावात गेल्या 21 वर्षांपासून म्हैसाळ योजनेचे पाणी येण्यासाठी शेतकऱ्यांची मागणी होती या मागणीसाठी आ.भारत भालके साहेबांनी गेल्या दहा वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करीत या योजनेसाठी निधी मिळविला अखेर या योजनेचे पाणी या तलावात दाखल झाल्यानंतर तलाव सध्या 50 टक्के पेक्षा जास्त भरला आहे
तसेच दक्षिण भागातील लघुपाटबंधारे विभागाअंतर्गत येणाऱ्या भोसे, हुलजंती, लवंगी, मारोळी, पडोळकरवाडी येथील साठवण तलाव व या भागातील छोटे पाझर तलावात पावसाळ्यात कृष्णेचे वाया जाणारे पाणी म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून भरून देण्याची तरतूद या प्रकल्प अहवालात आहे.. परंतु त्यामध्ये पाणी सोडण्यासाठी काही कामं अपूर्ण आहेत ती कामे लवकरात लवकर पुर्ण करावीत यासाठी आपण जलसंपदा मंत्री मा जयंत पाटील यांची भेट घेऊन पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले....
या पाणीपूजन कार्यक्रमावेळी उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले,तहसीलदार स्वप्निल रावडे, गटविकास अधिकारी राऊत पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे, सरपंच मायाक्का थोरबोले गुलाब थोरबोले
म्हैसाळ योजनेचे उपअभियंता बाबासाहेब पाटील, शाखा अभियंता सुभाष देवकते,मारूती वाकडे,भारत बेदरे,ज्ञानेश्वर खांडेकर,दादा दोलतोडे,जगन्नाथ रेवे ,मच्छिंद्र खताळ ,यशवंत होळकर, गुलाब थोरबोले अंबादास थोरबोले,उत्तम थोरबोले,दत्ता खांडेकर


No comments:
Post a Comment