Breaking

Wednesday, 23 September 2020

मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/अमीर आतार-मंडळ अधिकारी लाचलुचपत च्या जाळ्यात.


मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार-मंडळ अधिकारी लाचलुचपत च्या जाळ्यात- मंडळ अधिकारी लाचलुचपत च्या जाळ्यात        


खरेदी केलेल्या जमीन दस्तावर दाखल केलेल्या हरकतीचा निकाल लावण्यासाठी दहा हजार रुपयांची मागणी करून ती रक्कम स्वीकारत असताना हुलजंती महसूल मंडळाचे मंडलाधिकारी सत्यवान घुगे यांना लाचलुचपत पथकाने रंगेहाथ ताब्यात घेतले. 

तक्रारदार शेतकऱ्याने हुलजंती महसूल मंडळामध्ये लवंगी या ठिकाणी जमीन खरेदी केली असून, त्या जमिनीच्या खरेदी खताची नोंद करण्यासाठी दस्त दिला होता. त्या नोंदीवर हरकत आली होती. त्या हरकतीचा सुनावणी होऊन निकाल तक्रारदाराच्या बाजूने देण्यासाठी देण्यासाठी तलाठी व मंडल अधिकारी यांच्याकडे वारंवार भेट घेतली. मात्र या प्रकरणाचा निकाल लावण्यासाठी विलंब लावला जात होता. अखेरीस शेतकऱ्याकडे या प्रकरणाचा निकाल लावण्यासाठी 10 हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. ही रक्कम स्वीकारताना मंडलाधिकारी लाचलुचपत खात्याच्या ताब्यात रंगेहाथ सापडला. 

जनतेची वर्दळ असलेली मंगळवेढ्यातील कार्यालये सध्या जनतेला त्रास देत असल्याचे या दोन महिन्यांत झालेल्या कारवाईवरून दिसून आले. दोन महिन्यांतील कारवाईत पोलिस खात्याबरोबरच महसूल खातेही आता तालुक्‍यात बदनाम होऊ लागले आहे. नगरपालिका, पंचायत समिती, पोलिस स्टेशन यानंतर आता तहसील विभागातील अधिकारी लाचलुचपत प्रकरणात सापडला. कोरोनाच्या संकटामध्ये अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना व ग्रामीण जनतेला त्रासदायक वागणूक न देता सहानुभूतीची वागणूक देण्याची जबाबदारी असताना या काळात देखील जनतेला लुटण्याचे काम होत असल्याचे आजच्या अधिकाऱ्याच्या अटकेनंतर पुन्हा दिसून आले. 

काल बॅंकांतील अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना शेती कर्ज देण्याबाबत टोलवाटोलवी होत असल्याचे समोर आल्याने शेतकऱ्याने पेटवून घेण्याचा प्रयत्न केला होता; तर आज मंडलाधिकारी शेतकऱ्याकडून लाच घेताना जेरबंद झाला. लोकप्रतिनिधींनी तालुक्‍यातील प्रत्येक शासकीय कार्यालयाच्या विभाग प्रमुखांची बैठक घेऊन शहरी व ग्रामीण जनतेला त्रास होणार नाही या दृष्टीने कानउघाडणी करणे अत्यंत आवश्‍यक बनले आहे. 

आजची ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे, अप्पर पोलिस अधीक्षक पाटील, पोलिस उपअधीक्षक संजीव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक जगदीश भोपळे, हवालदार चंद्रकांत पवार, पोलिस नाईक पदमानंद चंगरपल्लू, पोलिस नाईक प्रमोद पकाले यांनी केली.

No comments:

Post a Comment