सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - लेह-लडाख सीमेवर जवान सचिन जाधव यांना विरमरण ,दुसाळेत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार - वीर जवान नाईक सचिन जाधव अमर रहे, भारत माता की जय, जब-तक सुरज चांद रहेगा सचिन तेरा नाम रहेगा, वंदे मातरम अशा घोषणा देत लेह-लडाख येथे चीन सीमेवर हुतात्मा झालेल्या नाईक सचिन जाधव यांच्या पार्थिवावर दुसाळे ता.पाटण येथे शासकीय इतमामात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले , यावेळी हजारोंनी साश्रुपूर्ण नयनांनी जाधव यांना निरोप दिला.
दुसाळे ता.पाटण येथील भारतीय सैन्य दलात सेवा बजावणारे नाईक सचिन जाधव हे 4 आॅगस्टला 45 दिवसांच्या सुट्टीवर गावी आले होते, मात्र सुट्टी पूर्ण होण्याआधीच चीन सीमेवर वाढलेल्या हालचालींमुळे त्यांना पुन्हा बोलवण्यात आले होते .
No comments:
Post a Comment