मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- मायक्रोफायनान्सने सुप्रिम कोर्टाच्या आदेशाचे पालन करावे अन्यथा बहुजन समाज पार्टी व बहुजन सत्यशोधक संघाचा तीव्र आंदोलनाचा इशारा- याबाबत सविस्तर वृत्त असे की महिला बचत गटांच्या संदर्भात मायक्रोफायनान्स कंपन्यांनी जो महिलांना प्रचंड त्रास द्यायला चालू केला आहे त्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने 28 सप्टेंबर पर्यंत कोणतेही कर्ज खाते एनपीए करू नये कोणालाही सीबीआय लागू करू नये कसलीही वसुली करू नये अशा प्रकारच्या सन्मानिय सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलेला आहे त्याचबरोबर सगळे व्याज माफ करण्यासंदर्भात तसेच व्याजा वरील तसेच व्याजाला व्याज व चक्रवाढ लागू न देण्यासाठी माननीय सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत परंतु अजूनही काही मायक्रोफायनान्स लोक महिलांना जाणून बुजून त्रास देत आहेत, लाॅकडाऊनच्या काळातील कर्जा वरील व्याज घेतात त्याची नोंद ही कर्ज खाते पुस्तकात करत नाहीत महिलांनी त्या संदर्भात त्यांना विचारले असता त्यांना कोणतेही समाधान कारक उत्तर मिळत नाही ते सरळ सरळ सगळ्या महिलांना फसवतात. बहुजन सत्यशोधक संघ व बहुजन समाज पार्टी व मायक्रोफायनान्सच्या महिलांचे असे म्हणणे आहे की, कंपनी महिलांना कर्ज देते वेळेस त्या महिलांचे इन्शुरन्स घेते त्याचे सर्टिफिकेटस देणे बंधनकारक असताना ते दिलेले नाही ते देण्यात यावे व सर्व वसुली हप्ते थांबवून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे या संदर्भात मा.तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले यावेळी बहुजन समाज पार्टी चे महासचिव येताळा खरबडे, बहुजन सत्यशोधक संघाचे ता अध्यक्ष समाधान भोसले, जिल्हा अध्यक्ष प्रदीप परकाळे, व जिल्हा नेते बाबा धनवजीर तसेच मंगळवेढा येथील महिला गटाच्या अध्यक्षा व सदस्य कल्पना खरबडे, अल्फाज खतिब, रिना आठवले, रेखा घाटुले, शितल आसबे, राजश्री माने, कविता सावंत, अंकिता गायकवाड, उज्वला चह्वाण उपस्थित होते.
Sunday, 20 September 2020
Home
/
मंगळवेढा
/
मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- मायक्रोफायनान्सने सुप्रिम कोर्टाच्या आदेशाचे पालन करावे अन्यथा बहुजन समाज पार्टी व बहुजन सत्यशोधक संघाचा तीव्र आंदोलनाचा इशारा.
मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- मायक्रोफायनान्सने सुप्रिम कोर्टाच्या आदेशाचे पालन करावे अन्यथा बहुजन समाज पार्टी व बहुजन सत्यशोधक संघाचा तीव्र आंदोलनाचा इशारा.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment