मराठा आरक्षण मागणी साठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने 21 सप्टेंबर रोजी पुकारलेल्या सोलापूर शहर बंदला जमियत उलमा ए हिंद आणि विविध सामाजिक संघटनांनी जाहीर पाठिंबा दिला..
मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सोलापूर शहर जिल्हा बंदची हाक दिली आहे 21 सप्टेंबर रोजी होणाऱ्या सोलापूर शहर बंद साठी मुस्लिम समाजातील जमियत ए उलमा हिंद, शिवराणा प्रतिष्ठान, शेळगी, दहिटने, मित्र नगर, येथिल अनेक मंडळ प्रतिष्ठांन यांच्या वतीने जाहीर पाठिंबा दिला. यावेळी एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, यासह विविध घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.
यावेळी जमियत ए उलमा हिंद संस्थेचे अध्यक्ष मैलाना कासमी, हाजी मैनोद्दीन शेख यांनी पाठिंब्याची माहिती दिली.
शिवराणा प्रतिष्ठान, शेळगी, दहिटने, मित्र नगर येशील युवकांनी पाठिंबा देत आपली भुमिका स्पष्ट केली.
बंदच्या पाठिंब्याचे पत्र स्वीकारताना मराठा क्रांती मोर्चा चे मुख्य समन्वयक दिलीप कोल्हे, दास शेळके, प्रताप चव्हाण, राम गायकवाड, मिलिंद भोसले, सुनिल रसाळे, अशोक कलशेट्टी, तुकाराम मस्के, श्रीकांत घाडगे, नगरसेवक अमोल शिंदे, संजय शिंदे, महेश धाराशिवकर, जयवंत सुरवसे, शेखर फंड योगेश पवार महेश धाराशिवकर, विजय पोखरकर, बाळासाहेब गायकवाड यांच्यासह सदस्य उपस्थित होते.
No comments:
Post a Comment