बीड जिल्हा प्रतिनिधी/ सुदाम शिंगाडे- अप्पर पोलिस अधीक्षक विजय कबाडे, उपअधीक्षक राहूल धस व श्रीकांत डिसले यांची बदली- याबाबत सविस्तर वृत्त असे की महाराष्ट्र राज्य पोलिस दलात मोठे फेरबदल झाले आहेत, बीड जिल्ह्यातील तत्कालीन पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांची नियुक्ती अमरावती येथे राज्य राखीव पोलीस बल गट - 9 च्या समादेशकपदी झाली आहे, व आर राजा यांची बीडच्या अधीक्षकपदी नियुक्ती झाल्यानंतर हर्ष पोद्दार हे पदस्थापनेच्या प्रतिक्षेत होते, बीड चे अप्पर पोलिस अधीक्षक विजय कबाडे यांची देखील बदली झाली आहे व त्यांची नियुक्ती नांदेड जिल्ह्यात भोकर येथे झाली आहे, त्यांच्या जागी सुनिल कृष्णा लांजेवार हे बीडच्या अप्पर पोलिस अधीक्षक पदी रूजू होणार आहेत, लांजेवार हे सध्या नाशिक येथे महाराष्ट्र पोलिस अकादमीत अधीक्षक आहेत, त्याचबरोबर बीड जिल्ह्यात तीन नवे उपविभागीय पोलिस अधिकारी येणार आहेत, बीडच्या एसडीपीओपदी मुंबई हून येणारे संतोष वाळके यांची नियुक्ती झाली आहे, अंबाजोगाईचे एसडीपीओ राहूल धस यांची पुणे जिल्ह्यात दौंड या ठिकाणी बदली झाली आहे त्यांच्या जागेवर सुनिल जायभाये यांची नियुक्ती झाली असून ते सध्या भोकरदनला कार्यरत होते,माजलगावचे एसडीपीओ श्रीकांत डिसले यांची नागपूर पोलिस प्रशिक्षण विद्यालयात बदली झाली आहे, त्यांच्या जागी सुरेश पाटील यांची नियुक्ती झाली आहे ते सध्या कळंब उस्मानाबाद येथे कार्यरत होते.
Thursday, 1 October 2020
Home
/
बीड
/
बीड जिल्हा प्रतिनिधी/ सुदाम शिंगाडे- अप्पर पोलिस अधीक्षक विजय कबाडे, उपअधीक्षक राहूल धस व श्रीकांत डिसले यांची बदली.
बीड जिल्हा प्रतिनिधी/ सुदाम शिंगाडे- अप्पर पोलिस अधीक्षक विजय कबाडे, उपअधीक्षक राहूल धस व श्रीकांत डिसले यांची बदली.
Subscribe to:
Post Comments (Atom)


Nice.i like it.keep it up
ReplyDelete