Breaking

Wednesday, 16 September 2020

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - केंद्रीय मंत्री नितिन गडकरी कोरोना पाॅझीटीह्व.


सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - केंद्रीय मंत्री नितिन गडकरी कोरोना पाॅझीटीह्व- केंद्रीय मंत्री व भाजपचे जेष्ठ नेते नितिन गडकरी यांची कोरोना चाचणी पाॅझीटीह्व आल्याने त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबतची माहिती स्वतः नितिन गडकरी यांनी आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून दिली आहे. 


" काल मला अशक्तपणा जाणवल्याने डाॅक्टरांचा सल्ला घेतला, तपासणी दरम्यान कोरोना बाधा झाल्याचे समोर आले, सध्या आपणा सर्वांच्या शुभेच्छांमुळे माझी प्रकृती ठीक असून मी स्वतःला आयसोलेट केले आहे अशी माहीती त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून दिली आहे.

देशातील कोरोना ग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे, आजच भारताने कोरोनाग्रस्त रूग्णसंख्येचा 50 लाखांचा टप्पा पार केला आहे. विशेष म्हणजे रूग्णसंख्या 40 लाखांपासून 50 लाखांपर्यंत पोहोचण्यासाठी केवळ 11 दिवसांचा कालावधी लागला आहे .

No comments:

Post a Comment