करमाळा तालुका / प्रतिनिधि संदीप शिंदे -
धनंजय डिकोळे व दिग्विजय बागल यांनी काल झालेल्या प्रकरणाची पत्रकारांशी नाक घासून माफी मागावी अन्यथा जनशक्ती सघटनेचे संस्थापक अतुल भाऊ खुपसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्याबाबतचे निवेदन जनशक्ती सघटनेने तहसीलदार व पोलिस स्टेशन करमाळा यांना दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे कि
करमाळा तालुक्यातील काही भुरटे पत्रकार खोट्या बातम्या देतात अशा बातम्यांवर विश्वास ठेवू नये असे वक्तव्य वैफल्यग्रस्त भावनेतून दिग्विजय बागल यांनी केलेतर या कार्यक्रमात शिवसेना जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे आमच्या कार्यक्रमात सुपारी घेऊन पत्रकार आले आहेत तुम्ही कुणाची सुपारी घेऊन पत्रकार परिषदेला आला आहात असा प्रश्न काही पत्रकारांना विचारून पत्रकारांना अपमानास्पद वागणूक दिली या कार्यक्रमात दिग्विजय बागल धनंजय डिकोळे या दोघांनीही पत्रकारा बद्दल अपशब्द वापरले होते नुकतेच बागल गटाचे नेत्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांची भेट घेतली होती या संदर्भात काही पत्रकारांनी बातम्या छापल्या होत्या व राजकीय प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता यावर बोलताना शिवसेनेच्या मेळाव्यात दिग्विजय बागल म्हणाले की काही भुरटे पत्रकार अशा बातम्या देतात अशा भुरट्या पत्रकारांकडे लक्ष देऊ नका याचा पत्रकार संघाने तीव्र निषेध केला आहेशिव संपर्क अभियानासाठी आलेले अनिल कोकीळ यांना पत्रकारांनी शिवसेनेच्या पक्षसंघटन संदर्भात काही प्रश्न विचारले शिवसेनेला कुर्डूवाडी नगरपालिकेत मते जास्त पडत आहेत पण विधानसभेला का मते कमी पडतात गद्दारी कुर्डूवाडी मधून होते का करमाळ्यातून होते. संघटनेतील गटबाजी बद्दल काही प्रश्न विचारले यावेळी संपर्कप्रमुख अनिल कोकीळ उत्तर देत असताना धनंजय डिकोळे यांनी थेट संपर्क प्रमुख अनिल कोकीळ समोरच हे पत्रकार सुपारी घेऊन पत्रकारिता करतात असा अपशब्द वापरून अपमानास्पद वागणूक दिली यावर काही पत्रकार व डिकोळे यांच्यात वाद झाला यावेळी एका पत्रकाराने प्रतिप्रश्न विचारला यामुळे संतप्त झाल्याने डिकोळे यांनी अजून अपशब्द वापरले त्यादिवशी झालेल्या शिवसेना संपर्क अभियानाच्या कार्यक्रमात दिग्विजय बागल व धनंजय डिकोळे दोघे वैफल्यग्रस्त होऊन बोलत होते यामुळे यांचा निषेध करत आहोत . दोघांनी पत्रकारांशी अर्वाच्च भाषेत वर्तन केले आहे. हे लोकशाहीला अशोभनीय असून लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा हा अवमान आहे. समाज घडविणाऱ्या, समाजाला ताकत देणाऱ्या पत्रकारावर असा अन्याय होत असेल तर जनशक्ती संघटना शांत बसणार नाही. येत्या दोन दिवसात या दोघांनी नाक घासून पत्रकारांची माफी मागावी अन्यथा त्यांच्या घरासमोर त्यांचे पुतळे उलटे टांगून जनशक्ती संघटना तीव्र आंदोलन करेल . या वेळी निवेदन देताना ता .उपप्रमुख शरद एकाड ,वैभव मस्के , तालुका महिला आघाडी प्रमुख दिपाली ढेरे , कार्याध्यक्ष किशोर शिंदे , तालुका उपप्रमुख प्रदीप शिंदे ,विध्यार्थी आघाडी प्रमुख रामराजे डोलारे , बालाजी तरंगे , महिला उपप्रमुख कोमल खाटमोडे , अजित सय्यद , ता .उपप्रमुख पांडुरंग भोसले.
No comments:
Post a Comment