Breaking

Friday, 13 May 2022

पंढरपूर तालुका प्रतिनिधी/ प्रसाद दप्तरदार - पंढरपूर सिंहगड मध्ये डायबेटीस मुक्त भारत व्याख्यान संपन्न.


*पंढरपूर सिंहगड मध्ये "डायबेटिस मुक्त भारत" व्याख्यान संपन्न*

पंढरपूर: प्रतिनिधी 

कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग मध्ये डाॅ. बी राजकुमार यांचे "डायबेटिस मुक्त भारत" या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. हे व्याख्यान मोठ्या उत्साहात संपन्न झाले असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली. 
      अलिकडच्या काळात शुगर, बीपी चे वाढते प्रमाण लक्षात घेऊन शरीराची काळजी घेणे आवश्यक आहे. वेळेवर हेल्थ चेकअप करणे आवश्यक आहे. आरोग्यास असंतुलन निर्माण झाल्यास अनेक रोग जडतात. आपली सामाजिक भुमिका सुव्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी शारीरिक, मानसिक दृष्ट्या सक्षम असणे आवश्यक असुन यासाठी नियमित व्यायाम व संतुलित आहार आवश्यक असल्याचे मत डाॅ. बी राजकुमार यांनी पंढरपूर सिंहगड मध्ये बोलताना व्यक्त केले. 
पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मध्ये प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली "डायबेटिस मुक्त भारत" या विषयावर व्याख्यान 
 आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानास डाॅ. अर्चना शेंडगे, डाॅ. बी राजकुमार, नेहा राजकुमार, क्षितिजा कदम-पाटील, हेल्थ अँबेसिडर पल्लवी सवासे आदी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिंहगड काॅलेज मधील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार डाॅ. स्वानंद कुलकर्णी यांनी केले.

No comments:

Post a Comment