स्वतःच्या आत्मविश्वासावर विश्वास ठेवून जीवन जगले पाहिजे. अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना प्लेसमेंट हा महत्त्वपूर्ण टप्पा असतो. तो टप्पा यशस्वी करायचा असेल तर मेहनत घेणे आवश्यक आहे. महाविद्यालय विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात. त्या स्पर्धेतून विद्यार्थ्यांची जडणघडण होत असते. म्हणून विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने अभ्यास करून यश प्राप्त करावे केवळ नोकरी मिळवी म्हणून शिक्षण घेणे नव्हे असे मत प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी व्यक्त केले.
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग कोर्टी पंढरपूर मध्ये शुक्रवार दिनांक १३ मे २०२२ रोजी "व्हर्च्युअल कॅम्पस" चे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन काॅलेजचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, डाॅ. अल्ताफ मुलाणी, डाॅ. भालचंद्र गोडबोले, प्रा. वैभव गोडसे विद्यार्थी प्रतिनिधी शुभम सलगर आदींच्या हस्ते सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यादरम्यान उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, डाॅ. अल्ताफ मुलाणी यांनी सहभागी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कुमारी प्राजक्ता उंबरकर हिने केले तर उपस्थितांचे आभार कुमारी जोत्सना राऊत हिने मानले.
No comments:
Post a Comment