Breaking

Sunday, 8 May 2022

कुर्डूवाडी प्रतिनिधी/ अमोल हावळे- कुर्डूवाडी येथे वीर शिवबा काशीद यांची 392 वी जयंती साजरी.


कुर्डुवाडी शहरात विररत्न शिवबा काशिद यांची ३९२ वि जयंती साजरी
प्रथम विररत्न शिवबा काशिद यांच्या प्रतिमेचे पुजन आप्पा बोरकर,नरेंद्र साळुंखे,हरीश भराटे,संदीप भराटे,युवराज हिवाळे,संदीप गावडे इ.मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या वेळी नाभिक समाजाचे प्रदेश युवक अध्यक्ष सुधिर भाऊ गाडेकर यांनी शिवबा काशिद यांच्या इतिहास सांगताना म्हणाले की,शिवबा काशीद हे शिवाजी राज्यांच्या सैन्यात गुप्तहैर खात्यात कार्यरत होते. त्यांनी शिवाजी महाराजांवर आणि पर्यायाने मराठी राज्यावर आलेल्या संकटाचे निवारण करतेवेळी आपल्या प्राणाचे बलिदान दिले, म्हणून शिवाजीराजे सिद्दी जोहरने पन्हाळगडाला दिलेल्या वेढ्यातून सुखरूप निघाले व विशाळगडावर पोहचले. हे शिवबा काशीद हुबेहूब शिवाजी राजांसारखे दिसत होते.
या वेळी रामभाऊ राऊत,अतुल राऊत,पोपट गाडेकर,संतोष गाडेकर,वैजिनाथ राऊत,ईश्वर गाडेकर,बालाजी गाडेकर,वसंत वाघमारे,संजय गाडेकर महाराज,अजय काशीद,ओंकार गाडेकर,सुधिर काशिद,तुळशीराम महाबोले,संजय काशीद,गणेश भालेकर,बापु दळवी यांचेसह,कुमार मराळ,अहमद तांबोळी,नामदेव ढेकळे यावेळी ऊपस्थीत होते.

No comments:

Post a Comment