Breaking

Thursday, 3 March 2022

विशेष प्रतिनिधी / अजित परबत- जनशक्तीच्या रस्तारोकोला पोलिसांनी परवानगी नाकारली.


जनशक्तीच्या रास्तारोकोला पोलिसांनी परवानगी नाकारली, अतुल खूपसे म्हणाले....

करमाळा | तालुक्यातील शेती पंपाची वीज तोडल्यामुळे तालुक्यातील शेतकरी चांगलाच संतापला आहे. शेतकऱ्यांचे हाता तोंडाशी आलेला घास या विजेमुळे जळून जात आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग चांगलाच संतापलेला पाहायला मिळत आहे. 

याच पार्श्वभूमीवर जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष अतुल खूपसे यांनी या प्रश्नांबाबत तालुक्यातील शेलगाव चौक येथे करमाळा ते टेंभुर्णी महामार्गावर रास्तारोको आंदोलन करण्याची घोषणा केली होती. 

मात्र या प्रकरणी पोलिसांनी एक नोटीस जारी करून सदर रास्तारोको आंदोलनाला परवानगी नाकारली आहे. त्यामुळे हे आंदोलन दोन दिवसांसाठी पुढे ढकलण्याची घोषणा खूपसे पाटील यांनी केली आहे. 

यावेळी बोलताना खूपसे म्हणाले की, मी पोलिस प्रशासनाचा सन्मान करतो, संविधानाला मानतो. उद्या महाशिवरात्र आहे. त्यात संगोबाची यात्रा आहे. त्यामुळे त्याठिकाणी पोलिसांना बंदोबस्ताला जावं लागतं आहे. माझे पोलिस अधिकाऱ्यांशी बोलणं झालं आहे. 

आपण हे आंदोलन उद्या न करता, येत्या पुढील 2 दिवसात करणार आहे. पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, त्यांच्यावर यात्रेचा तणाव आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसात परवानगी घेऊन हे रास्तारोको आंदोलन छेडण्यात येणार आहे. 

असे मत अतुल खूपसे पाटील यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले आहे.

 या आंदोलनाला शेतकऱ्यांचा चांगला पाठिंबा मिळणार असल्याची चर्चा चांगलीच रंगली होती.

No comments:

Post a Comment