आ.दादा तुम्ही मोडनिंब साठी भरपूर दिलं, पण तुमच्या इथल्या माणसांनी टक्केवारीतच घालवलं.
संपादक / विजयकुमार परबत-आ.दादा आपण गेल्या वीस ते पंचवीस वर्षांत मोडनिंब साठी भरपूर काही दिलं, रस्ते, सभामंडप, दिवे, इतर बाबींसाठी निधी परंतू तुमच्या इथल्या स्थानिक कार्यकर्त्यांनी ते टक्केवारीतच घालवलं असे चित्र सध्या मोडनिंब शहरात दिसत आहे. दादा तुमच्याच नावाचा वापर करून ही मंडळी मतांचा जोगवा मागतात, व्यापाऱ्यांना धमकावतात, स्थानिकांना धमकावतात, वरून तुमच्याच कडून निधी आणतात मात्र विकासकामे करताना ती निकृष्ट दर्जाची करतात, रस्ते येऊन बघा, भूमिगत गटारी, चेंबर बघा, किती निकृष्ट दर्जाची कामे केलीत ते आपल्याला दिसून येईल. दादा ही मंडळी ठेकेदाराकडून टक्केवारी घेतात, परवाच एका ठेकेदाराने नाव न सांगण्याच्या अटीवर ह्या गोष्टी सांगितल्या दादा, दादा आपण भरपूर काही दिलंत दादा पण आपल्याच कार्यकर्त्यांनी ते टक्केवारीतच घालवलं बघा दादा, दादा गेल्या दहा दिवसांपासून मोडनिंबचा पाणीपुरवठा बंद आहे बघा दादा पण ह्यांना त्याचे काहीच घेणेदेणे नाही दादा, दादा ही तुमच्यावर प्रेम म्हणून नाहीतर स्वार्थासाठी एकत्र आलेली मंडळी आहेत बघा दादा.
उद्या मोहीते-पाटलांना चांगले दिवस आले, जर का जिल्हा त्यांच्या ताब्यात गेला तर ही मंडळी तुम्हाला सोडून त्यांच्याकडे एका पायावर तुम्हाला सोडून जातील बघा दादा, दादा ह्यांनी कोरोनात सुद्धा लयं लुटलं बघा दादा असं गाववालेच सांगतात बघा दादा, दादा मोडनिंब मध्ये ह्यांच्या मनाचेच कायदे आहेत बघा दादा, ह्यांना वेळीच लगाम घाला दादा, नाहीतर ही मंडळी मोडनिंबचं होत्याचे नव्हते करून टाकतील दादा, चांगली माणसं ह्यांनी बाजूला ठेवली बघा दादा. ह्यांनी काय दिवे लावलेत ते पण तपासून बघा दादा. ही मंडळी फक्त तोंडावर गोडगोड बोलणारी आहेत बघा दादा. यांचा उद्देशच आपण सगळे भाऊ भाऊ आणी एकत्र मिळून खाऊ असा आहे बघा दादा. आणी हो दादा एक सांगायचंच राहीलं ही मंडळी खऱ्याचं खोटं, आणी खोट्याचं खरं करायला भारतात एक नंबर आहेत बघा दादा, म्हणून म्हणतो दादा आपण मोडनिंब साठी भरपूर काही दिलं पण इथल्यांनी ते टक्केवारीतच घालवलं, शेवटी एकच विनंती आहे दादा ह्यांना वेळीच लगाम घाला व मोडनिंब ला वाचवा दादा.


No comments:
Post a Comment