ज्योतीताई भुजंगे राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित
रयत सामाजिक प्रतिष्ठान बीड महाराष्ट्र यांच्या माध्यमातून क्षेत्रांमध्ये उल्लेख उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांसाठी दिला जाणारा पुरस्कार बहुजन सत्यशोधक महिला संघ या सामाजिक संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्षा ज्योतीताई भुजंगे यांना देण्यात आला, भुजंगे मॅडम यांचा बहुजन सत्यशोधक महिला संघ संघटनेच्या माध्यमातून महिलांना रोजगार निर्माण करण्यासाठी मार्गदर्शन करत असतात, महिलांनी सक्षम बनण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून मेळावे घेऊन जागृती निर्माण करण्याचं काम सतत त्या करत असतात, विद्यार्थ्यांना जागृत करून व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी हे ते विविध ठिकाणी जाऊन मार्गदर्शन करत असतात, त्यामुळे त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला यावेळी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.सुनील ओहोळ, जिल्हाध्यक्ष गणेश देवकते, युवक जिल्हाध्यक्ष महादेव गाडे, विविध राजकीय सामाजिक संघटनेच्या पदाधिकारी त्यांचे अभिनंदन केले.


No comments:
Post a Comment