Breaking

Sunday, 6 March 2022

विशेष प्रतिनिधी/ अजित परबत- अंध असूनही सर्व सामान्य शेतकर्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जामगाव च्या प्रहार सैनिकाचे आमरण उपोषण.


*पूर्ण पने अंध असून देखील सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी जामगाव चे प्रहार सैनिक आमरण उपोषणासाठी बसले असून देखील वीज मंडळ आणि सरकारला येईना जागं. प्रहार शेतकरी संघटनेचे तालुका सहसचिव अंध असून सुद्धा  मालोजीराजे चव्हाण यांचे जामगाव येथे वीज पुरवठा सुरळीत करणेसाठी आमरण उपोषण चालू आहे. त्याचा आजचा आंदोलनाचा पहिला दिवस पार पडला. Mseb चे  कर्मचाऱ्यांचे पूर्ण पने दुर्लक्ष असल्याचे दिसून आले. उद्या पासून प्रहार शेतकरी संघटना आणखीन आंदोलन तीव्र करणार असल्याचे प्रहार चे तालुका सहसचिव मालोजी चव्हाण यांनी सांगितले. त्या ठिकाणी प्रहार चे जिल्हा समन्वयक पंडित साळुंके, जनहित शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष विशाल बरबोले यांनी भेट दिली. त्या प्रसंगी मोहन पाटील, भास्कर चव्हाण, पवा चव्हाण, अभिजित चव्हाण,मदन पाटील, हनुमंत घोडके , हुसेन शेख, रविराज पाटील, महेश चव्हाण, भाऊसाहेब चव्हाण, विशाल पाटील, राजाराम चव्हाण, गणेश चव्हाण, अभिजित चव्हाण, आकाश घुले, नाना बोबडे अशा शेकडो शेतकऱ्यांनी या आंदोलनाला पठिंबा दिला आणि उपस्थिती दर्शवली.*

No comments:

Post a Comment