कुर्डूवाडी पंचायत समितीच्या आवारातील स्वातंत्र्य सैनिकाच्या स्तंभाला जनशक्ती कडून होणार दुग्धाभिषेक
माढा तालुक्यातील कुर्डूवाडी पंचायत समितीच्या आवारात एका बाजूला संविधान तर दुसर्या बाजूला स्वातंत्र्य सैनिकांचा नामोल्लेख असलेला स्तंभ आहे. त्याच्या शेजारी सध्या एक भलामोठा पुतळा उभारण्याचे नियोजन असल्याने स्वातंत्र्य सैनिकाच्या स्तंभाचा अवमान होत आहे. त्यामुळे शेजारी होत असलेल्या पुतळ्याला आमचा विरोध आहेच मात्र स्तंभालेखाचा अवमान झाल्याने या स्वातंत्र्यसैनिकाच्या स्तंभाला जनशक्ती संघटनेच्या वतीने आज दि.२४ फेब्रुवारी रोजी दूग्धाभिषेक करण्यात येणार असल्याचे निवेदन अध्यक्ष अतुल खूपसे पाटील यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी यांना दिले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, पंचायत समितीच्या आवारात होणाऱ्या पुतळ्याला आमचा विरोध नाही मात्र त्याच्या शेजारी असणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांचा चबुतरा पायथ्याशी झाला आहे. हा अवमान स्वातंत्र्यसैनिकांचा व त्यांच्या कुटुंबीयांचा आहे. तो आम्हाला मान्य नाही त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी तो भव्य पुतळा होऊ देणार नाही. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी आम्हाला कोणतीही कल्पना नसल्याचे सांगितले. मग हा पुतळा नेमका कोणाच्या परवानगीने बसवला याची सखोल चौकशी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. दरम्यान स्वातंत्र्यसैनिकांचा हा झालेला अवमान आम्ही दुग्धाभिषेक करून धुऊन काढणार असल्याचे त्यांनी सांगितले.


No comments:
Post a Comment