संपादक/ विजयकुमार परबत
- शेटफळ बीटचे पोलीस चंद्रकांत आदलिंगे यांना निलंबित करावे, संग्राम सिताराम फाटे-पाटील यांची सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक साहेब यांचेकडे तक्रार- याबाबत सविस्तर वृत्त असे की मोहोळ तालुक्यातील मौजे शेटफळ येथे मटका,देशी दारू, जुगार, अवैध वाळू उपसा हे दोन नंबर चे धंदे अगदी ओपन चालू आहेत, व याकडे वारंवार तक्रार करून देखील शेटफळ पोलीस बीटचे पोलीस चंद्रकांत आदलिंगे हे याबाबत धंदे बंद करायचे सोडून अशा अवैध धंद्यांना सहकार्य करीत आहेत तसेच ते शेटफळ पासून तीन ते चार किलोमीटर अंतरावरच राहतात व गावापासून जवळच त्यांची नेमणूक असल्यामुळेच ते राजकीय वजनाचा वापर करून कायद्याचा गैरवापर करीत असल्याचे या निवेदनात फाटे यांनी म्हंटल आहे.
मागील महिन्यात चार ते पाच जण हरणाची तस्करी करण्यासाठी आले होते त्यावेळी सुद्धा फाटे यांनी आदलिंगे साहेबांना फोनवरून याबाबत माहीती दिली परंतू त्यावेळेस सुद्धा आदलिंगे साहेबांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे या निवेदनात म्हंटल आहे.
तसेच शेटफळ येथील अवैध धंदेवाल्यांकडून पोलीस आदलिंगे हे हप्ते वसूल करीत असल्याचेही या निवेदनात फाटे यांनी म्हंटल आहे, तसेच आपण जातीने लक्ष घालून या पोलीसाची कसून चौकशी करण्यात यावी व त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी व शेटफळ करांना न्याय मिळवून देण्यात यावा अशी मागणी फाटे यांनी केली आहे, व अशा प्रकारचे निवेदन त्यांनी सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक साहेब यांना दिले आहे.


No comments:
Post a Comment