Breaking

Thursday, 24 February 2022

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी /सतिश निंबाळकर - वंचित बहुजन आघाडीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.


वंचित बहुजन आघाडी च्या वतीने छत्रपती शिवाजीमहाराज यांची जयंती उत्साहात साजरी- तालुक माळशिरस  बाभुळगाव येथे बहुजन हिताय बहुजन सुखाय या  विचाराला अनुसरून शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त कष्ट करी श्रमिक कामगारांसाठी श्रम कार्ड चे वाटप करण्यात आले. सर्व असंघटीत कामगारांना कल्याण विभागांतर्गत ज्या सुविद्या ऊपलब्ध आहेत त्या मिळऊन देणार असे आपल्या मनोगतात व्यक्त करताना वंचित बहुजन आघाडी माळशिरस तालुका संघटक विकास दळवी यांनी सांगीतले.  प्रथम डॉक्टर अरून दळवी यांनी  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले.  यावेळी माजी सरपंच सदाशिव दळवी, माजी सरपंच हनुमंत दळवी, धनाजी सुरवसे, वंचित कार्याध्यक्ष गोरख कांबळे,अमोल कांबळे, लखन दळवी,समाधान कुंभार, सनमेश दळवी, आणी सर्व  बाभुळगाव ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment