*'सिंहगड' पंढरपूरच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागात 'प्लॅनिंग अँड डिझाईन युजींग ऑटोकॅड' या विषयावर साप्ताहिक कार्यशाळा संपन्न*
एस.के.एन.सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर
येथील स्थापत्य अभियांत्रिकी विभागमध्ये व्दितीय वर्ष स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित 'प्लॅनिंग अँड डिझाईन युजींग ऑटोकॅड' या विषयावर आधुनिक पध्दतीचे ऑटोकॅड हे सॉफ्टवेअर वापरुन
स्थापत्य अभियांत्रिकी क्षेत्रातील विविध प्रकल्पांचे प्रारूप नकाशे तयार करण्याविषयीची साप्ताहिक कार्यशाळा संपन्न झाली असल्याची माहिती स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. श्रीगणेश कदम व या कार्यशाळेचे समन्वयक प्रा. गणेश लकडे यांनी दिली.
हि कार्यशाळा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या संकल्पनेतून, विभागप्रमुख डॉ. श्रीगणेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली, समन्वयक प्रा. गणेश लकडे, सह समन्वयक प्रा. रोहित गायकवाड यांच्या उत्कृष्ट नियोजनेतून आयोजित करण्यात आली होती.
या कार्यशाळेत एकूण २२ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवला.
कोविड १९ निर्बंधांच्या अनुषंगाने दोन डोसचे लसीकरण पूर्ण झालेले २२ विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यात आले होते. या कार्यशाळेत सहभागी विद्यार्थ्यांना प्रा. गणेश लकडे यांचे मार्गदर्शन लाभले.
सदर कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी प्रा. रोहित गायकवाड यांच्यासह स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.


No comments:
Post a Comment