डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळ आणी माता रमाई महिला मंडळ कुर्डूवाडी यांच्या वतीने रमाई भीमराव आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर डॉक्टर अनुपमा पोळ यांनी माता रमाई यांच्या जीवनातील अनेक प्रसंग सांगितले, त्या स्वता कष्ट सहन करून बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षणासाठी सहकार्य करीत होत्या असे यावेळी त्या म्हणाल्या. उपस्थित महीलांनी आपले मनोगत व्यक्त केले. adv. उमा नितीन आखाडे यांची माढा तालुका खजिनदार पदी निवड झाल्याबद्दल विमल ताई डांगे यांनी पुष्पहार घालून सत्कार केला. राजमाता महिला मंडळाच्या वतीने साड्या वाटप करण्यात आल्या. आणी खाऊ वाटप चा कार्यक्रम ही करण्यात आला. या प्रसंगी उपस्थित महीला विमलताई डांगे, लताताई मोरे, उमा आखाडे, जयश्री ताई माने ,यांनी उत्कृष्ट सूत्रसंचालन केले मोठ्या प्रमाणावर महिला उपस्थित होत्या.
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment