Breaking

Saturday, 12 February 2022

माढा तालुका प्रतिनिधी/ मदन मुंगळे - 14/2/2022 ला केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या विरोधात बहुजन सत्यशोधक संघाचा मोर्चा.


*दि.१४/२/२०२२ ला केंद्र शासन व राज्य सरकार यांच्या विरोधात बहुजन सत्यशोधक संघाच्या वतीने " मोर्चा*

केन्द्र व राज्य शासनाच्या विरोधात दि.१४/२/२०२२ ला  बहुजन सत्यशोधक संघाच्या वतीने 
बहुजन सत्यशोधक संघ 
 संस्थापक अध्यक्ष  :  मा.सुनिल ओहोळ साहेब यांच्या नेतृत्वाखाली 
केंद्र शासन व राज्य सरकार यांच्या विरोधात कुर्डूवाडी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा 
सोमवार दि. १४/२/२०२२ वेळ सकाळी १०.३० व ठिकान:👉डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा समोर  
मार्ग:- टिळक चौक ,गांधी चौक, शिवाजी चौक ,नवी पेठ ,भगवा चौक, ते प्रांत कार्यालय.वर मोर्चा काढनार
आसल्याची माहीती बहुजन सत्यशोधक संघाचे संस्थापक अध्यक्ष सुनिल ओहोळ यांच्यासह जिल्हा युवक अध्यक्ष महादेव गाडे,उपाध्यक्ष नितीन वाघमारे, यांनी दिलेल्या निवेदनात  म्हणटले आहे.
दिलेल्या निवेदनात खाली दिलेल्या
१)अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम १९८९ अन्वये दाखल गुन्ह्यांच्या तपासाचे अधिकार पोलीस निरीक्षक (गट-अ) आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक (गट-ब) दर्जाच्या अधिकाऱ्यांना प्रदान करण्याचा गृहविभागाचा प्रस्तावित असंविधानिक प्रस्ताव जीवघेणा असून तो तात्काळ रद्द करावा,
२) शूरवीर हज़रद टीपू सुल्तान यांच्या बदल अपशब्द बोलणार्या देवेंद्र फडणवीस यांच्या विरूध्द देशद्रोहचा गुन्हा दाखल करवा
३) एस.सी.एस.टी. वरती होणार्या अन्याय व अत्याचार विरोधात 
४) एस.सी.एस.टी खोटे गुन्हे दाखल करणार्या पोलीस यंत्रणेविरोधात 
५)मंत्री गट समितीच्या २००६शिफारशी प्रमाणे ओबीसीना ही पदोन्नतीसह आरक्षण तात्काळ लागू करावे 
६)ओबीसीच्या स्थानिक स्वराज संस्थांमधील आरक्षणासाठी तात्काळ आयोग नेमताना.
७)पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमती विरोधात 
८) शेतकरी व घरगुती वीजबील माफ़ न करणार्या सरकारविरोधात
९)ओ.बी.सी. जातिनिहाय जनगणना न करनार्या जातीयवादी सरकारविरोधात 
१०)ईव्हीएम. मशीन बंद न करणार्या लोकशाही विरोधी सरकारविरोधात 
११)संजय गांधी निराधार व श्रावणबाळ यजनेतील लाभार्थ्यांसाठी असलेली 21000 रुपयांच्या उत्पन्नाची मर्यादा किमान 50 हजार रुपये वाढविणे अत्यंत आवश्यक आहे. 
१२)रमाई आवास योजनेच्या जाचक अटी रद्द कराव्यात 
या मागन्या मान्य न झाल्यास ठिकान: कुर्डूवाडी👉डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा समोर  
मार्ग:- टिळक चौक ,गांधी चौक, शिवाजी चौक ,नवी पेठ ,भगवा चौक, ते प्रांत कार्यालयवर. मोर्चा काढणार
 असल्याचा इशारा दिला आहे. 
या मोर्चाला सर्व बहुजनांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान
मा.गणेश.देवकते बहुजन सत्यशोधक संघ जिल्हा अध्यक्ष 
मा.महादेव.गाडे बहुजन सत्यशोधक संघ युवा जिल्हा अध्यक्ष 
मा.योगेश नाईकनवरे बहुजन सत्यशोधक संघ युवा जिल्हा उपाध्यक्ष 
मा.नितिन.वाघमारे बहुजन सत्यशोधक संघ जिल्हा उपाध्यक्ष 
मा.योगेश. इंगळेबहुजन सत्यशोधक संघ  जिल्हा महासचिव
मा.सतिश.वाघमारे बहुजन सत्यशोधक संघ जिल्हा सदस्य 
बहुजन सत्यशोधक संघाचे 
प्रशांत नाईक नवरे 
बहुजन सत्यशोधक संघ आयटी सेल पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष
मा.अनिल.सरवदे बहुजन सत्यशोधक संघ कार्यकारणी सदस्य पश्चिम महाराष्ट्र  केले आहे.

No comments:

Post a Comment