Breaking

Wednesday, 5 January 2022

टेंभूर्णी शहर प्रतिनिधी/ अक्षय खंदारे - युवा नेते राम पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न.


युवा नेते राम पवार यांच्या वाढदिवसानिमित्त 
 रक्तदान शिबिराचे आयोजन.
११३ जणांचे रक्तदान
टेंभुर्णी प्रतिनिधी:-  युवा नेते राम पवार यांच्या वाढदिवसानिमित्त साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे  सभागृह येथे ५ जानेवारी रोजी सकाळी ९ ते ५ या वेळेस रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सध्या कोरोनामुळे रक्ताची कमतरता भासत असल्याने अनेकांचे जीव धोक्यात आहे, त्यासाठी आपण सर्वांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपत अनेकांचे जीव वाचवण्यासाठी मदत करून आणि माणुसकीचे दर्शन घडवले. या रक्तदान शिबिरात११३ इतक्या रक्तदात्यांनी सहभाग घेऊन रक्तदान केले या रक्तदान शिबिरात रक्त संकलनासाठी पंढरपूर ब्लड बॅंक, पंढरपूर या रक्तपिढीने सहकार्य केले. या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी शिवाजीराव पाटील, टेंभुर्णी चे सरपंच प्रमोद कुटे, उपसरपंच धनंजय गोंदिल, वैभव कुटे, ग्रामपंचायत सदस्य मधुकर देशमुख, गणेश केचे, विकास धोत्रे, जयवंत पोळ, शैलेश ओहोळ, डाॅ. सोमनाथ साळुंके तसेच ऋषिकेश बोबडे, नामदेव धोत्रे राहूल तिपाले, सुरेश लोंढे, शिवाजी गोंदिल, विजय कोकाटे, अविनाश धोत्रे, सोमनाथ कदम, बाबा मुलाणी, विकास धोत्रे, संतोष धोत्रे, दिलीप पवार,  सागर कांबळे, दिपक मंजुळे, जॉकी सुर्वे, सचिन पवार, दीपक पवार, औदुंबर भागवत, विजय कोकाटे, नितीन चव्हाण, कालिदास पवार,दादा माने, राकेश जगताप, टिंकू कीर्ते,  संतोष शिंदे प्रतीक माने तसेच पत्रकार अनिल जगताप, सतिश चांदगुडे, सोपान ढगे,सुरज देशमुख, धनंजय मोरे, गणेश चौगुले, राजेंद्र केदार,सचिन होदाडे, तसेच पंढरपूर ब्लड बॅंक चे सदस्य सागर जाधव, दत्तात्रय गंगधरे, राणी जुमाळे, रजिया नदाफ आदीजण उपस्थित होते. रक्तदानाबरोबरच टेंभुर्णी येथील गोविंद वृद्धाश्रमात अल्पोपाहाराचे देखील वाटप करण्यात आले.  या कार्यक्रमासाठी अजिंक्य संगितराव, आकाश जगताप,  सुरज जाधव, विशाल पवार,  विकास सुर्वे, अमर चव्हाण, अजय पवार, योगेश पवार, शुभम कांबळे यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment