Breaking

Thursday, 6 January 2022

विशेष प्रतिनिधी/ महादेव गाडे - बहुजन सत्यशोधक संघाच्या सोशल मिडीया आयटी सेलच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रशांत नाईकनवरे.


पंढरपूर प्रतिनिधी
बहुजन सत्यशोधक संघ
 सोशल मीडिया आयटी सेलच्या अध्यक्षपदी प्रशांत नाईकनवरे.
बहुजन सत्यशोधक संघ या सामाजिक संघटनेच्या सोशल मीडिया सेलच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पदी प्रशांत नाईकनवरे यांची निवड बहुजन संघाचे  राष्ट्रीय अध्यक्ष सुनील ओहोळ यांनी केली. यावेळी बोलताना प्रशांत नाईकनवरे म्हणाले की आजच्या काळामध्ये समाजामध्ये जागृती निर्माण करण्यासाठी प्रसारमाध्यमांची भूमिका खूप मोठी महत्त्वाची असून चालू च्या काळामध्ये प्रिंट मीडिया इलेक्ट्रिकल मिडीया खूप महत्त्वाचा असून महापुरुषांचे व संघटनेचे विचार लोकांपर्यंत पोहोचण्याचे सर्वात मोठे साधन आहे, या साधनाचा वापर युवकांनी चांगल्या गोष्टीसाठी करावा,महापुरुषांचे विचार त्यांचे कार्य 
 युवकांनी घराघरात पोचवावे, बहुजन सत्यशोधक संघ संघटनेचे काम हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू असून बेरोजगार युवक, कष्टकरी कामगार भूमिहीन शेतमजूर,
असंघटित कामगार, विट बीगार कामगारासाठी  लढणारे आक्रमक संघटनेचे संघटना असून संघटनेने जी जबाबदारी माझ्यावर दिली आहे ती सक्षम पणे पार पाडून लोकांना न्याय व त्यांचे हक्क व अधिकार मिळवून देण्याचा प्रयत्न करेन ते म्हणाले. यावेळी जिल्हाध्यक्ष गणेश देवकते, जिल्हा युवा अध्यक्ष महादेव गाडे, जिल्हा उपाध्यक्ष नितीन वाघमारे जिल्हा महासचिव योगेश इंगळे, जिल्हा उपाध्यक्ष  योगेश नाईकनवरे, तालुकाध्यक्ष मसा नाईकनवरे, आबासाहेब पाटोळे, श्रीकांत जवंजाळ, आप्पासाहेब ओहोळ, सतीश वाघमारे, महिला पंढरपूर तालुका अध्यक्ष पूजा झरकर, उपाध्यक्ष पुष्पा जगताप, शिवाजी ओहोळ, रोहित रावडे हे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment