कुर्डूवाडी/प्रतिनिधी :- शहरातील नागरिकांसाठी ई-श्रम कार्ड मोफत शिबिरा चे आयोजन तसेच निराधार गरजू लोकांना ब्लॅंकेट चे मोफत वाटप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कुर्डुवाडी शहर युवक आघाडीच्या वतीने करण्यात आले.
यावेळी ५०० ई-श्रम कार्ड ची नोंद घेण्यात आली तसेच ५० निराधार व गरजू लोकांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधून केंद्रीय समाज कल्याण मंत्री रामदासजी आठवले यांच्या वाढदिवसा निमित्त कुर्डुवाडीत पंचायत समिती समोर हा उपक्रम घेण्यात आला.
प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.या शिबिरामध्ये महिलांनी उत्स्फूर्त असा सहभाग नोंदविला.
यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख धनंजय डिकोळे,रिपाईचे युवा नेते आकाश जगताप,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रांतिक सदस्य दत्ताजी गवळी, बहुजन सत्यशोधक संघाचे सुनील ओहोळ,युवा नेते वसीमभाई मुलाणी, इर्शाद कुरेशी,यासिन बहामद,भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष क्षिरसागर,रासपचे जिल्हा संपर्कप्रमुख दिलीप गडदे,शिवसेना शहर प्रमुख समाधान दास,माजी शहर प्रमुख कुमार गव्हाणे,मनसेचे आकाश लांडे युवराज कोळी बसपाचे सचिन वाळके,रासपचे धनु कोकरे,अभिजीत सोलंकर,तात्या इंगोले,अकलाख दाळवाले,बंडू टोणपे,संदीप भराटे,दर्शन शर्मा साईनाथ गायकवाड राजेंद्र वजाळे सनी खवळे,मिलिंद डिकोळे,अमर बडेकर,अमित ओहोळ,मेजर गोरे,दींसह मान्यवर उपस्थित होते.
यासाठी युवक अध्यक्ष जितेंद्र गायकवाड,विशाल मोरे,इम्रान शेख, किशोर (आप्पा) ढवळे,राजेंद्र लंकेश्वर,बुंदी राऊत,केतन राऊत,विनायक आयवळे,बाबा आयवळे,रियाज शेख,इस्माईल कुरेशी, सुरज कांबळे, आदींनी परिश्रम घेतले


No comments:
Post a Comment