कराड तालुक्यातील कार्वे-कोरेगाव मार्गावर भैरोबा मंदिराशेजारी असणाऱ्या उसाच्या शेतात अंदाजे 25 वर्षीय युवतीचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून झाला आहे. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, सोमवारी सकाळी कार्वे-कोरेगाव मार्गावर भैरोबा मंदिरानजीक उसाच्या शेतात 25 वर्षीय युवतीचा डोक्यात निर्घुण खून झाल्याची घटना उघडकीस आला आहे. युवतीची ओळख अद्याप पटलेली नाही. घटनेची माहिती मिळताच कराड तालुका पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे, उपनिरीक्षक भैरवनाथ कांबळे, भरत पाटील यांच्यासह पोलिस कर्मचारी दाखल झाले आहेत.
कराड तालुक्यातील कार्वे भागात झालेल्या खुनामुळे तालुक्यात खळबळ उडाली. कराड तालुक्यातील नववर्षात पहिलाच खून हा या भागात झाला आहे. तसेच गेल्या काही दिवसापासून खूनाची मालिका ही सतत घडत असल्याने पोलिसासमोर मोठे आवाहन आहे. युवतीचा डोक्यात दगड घातल्याने चेहरा पूर्णपणे ओळखत नाही, त्यामुळे युवतीची ओळख पटवणे व मारेकऱ्यांचा तपास पोलिस करत आहेत.


No comments:
Post a Comment