#15_ते_18_विद्यार्थी_विद्यार्थिनी_वयोगटातील #लसीकरण_मोहिमेस_गटनेते_आनंद_चंदनशिवे_यांच्या #प्रयत्नातून_सुरुवात
#सोलापूर:-आज दि.03-02-2022 रोजी सकाळी 9 वाजता #सोलापूर_महानगरपालिकेचे_उपायुक्त_धनराज #पांडे_व_गटनेते_आनंद_चंदनशिवे यांनी 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थी विद्यार्थ्यांनी लसीकरण मोहिमेत सुरुवात झाली. असता शेठ गोविंदजी रावजी आयुर्वेदिक महाविद्यालय लसीकरण केंद्रावर भेट दिली.
सो.म.पा. उपायुक्त धनराज पांडे म्हणाले की,सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने सोलापूर शहरात 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थी-विद्यार्थिनींना लसीकरण चालू झाले आहे. तिसऱ्या लाटेच्या अनुशंगाने आज शेठ गोविंदजी रावजी आयुर्वेदिक महाविद्यालय येथून सुरुवात झालेली आहे. या ठिकाणी चांगल्या पद्धतीने तरुणांकडून उस्फुर्त असा लसीकरणाला प्रतिसाद भेटत आहे. सकाळी 9 वाजल्यापासून ते 5 वाजेपर्यंत 305 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आहे.
गटनेते आनंद दादा चंदनशिवे यांच्या प्रयत्नातून शेठ गोविंदजी रावजी आयुर्वेदिक महाविद्यालयत 5 मे 2020 मध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्र सुरू झाले. या केंद्राला 9 महिने पूर्ण झाली आहेत शहरातील एक शिस्तबद्ध व आदर्श लसीकरण केंद्र म्हणून ओळखले जाते.
यावेळी स्टॉप अनिता शेलार, अमित कावल, कशिश शहा, मोक्षा शहा, चेतना मोजोडकर, आदी स्टॉप उपस्थित होते.
यावेळी प्रमुख उपस्थित डब्ल्यू.एच.ओ. चे वैद्यकीय अधिकारी डॉ.विवेक परदेशी, आरोग्य अधिकारी डॉ. बसवराज लोहारे, आयुर्वेदिक कॉलेजचे सी.ए.ओ.अनुप दोशी, डॉ.अविनाश चव्हाण डॉ.मंजली कुलकर्णी, डॉ.सायली शेंडगे, हर्षल कोठारे, धर्मेश राडिया, केतन मोरा, अनिल छाजेड, आरोग्य निरीक्षक विजय साळुंखे, श्रीमंत आप्पा जाधव, सुरज गायकवाड, आदित्य चंदनशिवे आदी उपस्थित होते.


No comments:
Post a Comment